हिंदू तेजाचा हुंकार !

03 Dec 2023 16:45:15
कानोसा 
 
- अमोल पुसदकर
babari-ayodhya राम जन्मभूमीचा इतिहास हा हिंदू समाजाने आपल्या देवाकरिता केलेल्या संघर्षाचा इतिहास आहे. इसवी सन १५२८ मध्ये बाबराचा सरदार मीर बांकी याने अयोध्येमध्ये उभे असलेले मंदिर तोडून ध्वस्त केले. परंतु, तो त्या मंदिराचा समूळ नायनाट करू शकला नाही. त्यामुळे अयोध्येतील जे मंदिर होते त्या मंदिराच्या वरती केवळ घुमट बांधण्याचे काम केले. babari-ayodhya परंतु त्या मंदिराचे मशिदीमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. संत तुलसीदासांच्या ‘रामचरित मानस' व अकबराच्या ‘आईने अकबरी'मध्येसुद्धा या जागेचा ‘मशीद' असा उल्लेख नाही. babari-ayodhya १५२८ पासून तर १९९२ पर्यंत या जवळपास साडेचारशे वर्षांच्या कालावधीमध्ये हिंदू समाजाने साडेचारशेपेक्षा अधिक लढाया लढल्या. हजारो लोकांचे बलिदान श्रीराम जन्मभूमीवरील मंदिरासाठी झाले. babari-ayodhya त्यामुळे श्रीराम जन्मभूमीचा इतिहास हा हिंदू समाजाने केलेल्या संघर्षाचा इतिहास आहे.
 
 
 
babari-ayodhya
 
 
स्वातंत्र्यानंतरही हिंदू समाजाचे आराध्य दैवत असलेले प्रभू रामचंद्र हे कुलूपबंद होते, म्हणजे कारागृहातच होते. अनेक न्यायालयीन लढाया लढल्या गेल्या आणि त्यानंतर तेथे पूजाअर्चा करण्याची परवानगी सर्वसामान्य भक्तांना मिळाली. babari-ayodhya तरीही यामुळे भव्य मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा होणार नव्हता. त्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये जनजागरण करणे आवश्यक होते आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेने संपूर्ण देशभरामध्ये जनजागरण करण्याचे ठरविले. त्यासाठी काही लाख गावांमध्ये राम ज्योती पूजन तर कधी राम पादुका पूजन घेण्यात आले. अयोध्येच्या मंदिर निर्माणासाठी आपल्या गावातून एक तरी वीट गेली पाहिजे यासाठी रामशिला पूजन झाले. babari-ayodhya १९९० मध्ये कारसेवकांना अयोध्येमध्ये एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. त्यावेळेस उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या मुलायम सिंगचे सरकार होते. त्याने रावणासारखी, कंसासारखी गर्वाने भरलेली घोषणा केली की, ‘परिंदा भी पर नही मार सकता.' कोणीही कारसेवक अयोध्येमध्ये पोहोचू शकणार नाही. babari-ayodhya अयोध्येकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. बसेस बंद करण्यात आल्या. तरीही संपूर्ण देशभरातून कारसेवक अयोध्येकडे पोहोचत होते.
 
 
हे वर्ष होते १९९० चे, महिना होता ऑक्टोबर. जवळपास २०० ते २५० किलोमीटरचे अंतर हजारो कारसेवकांनी पायी तुडवले व ते अयोध्येत पोहोचले. ज्यांची भाषा माहीत नाही, जे कोणत्या राज्यातून आले हे माहीत नाही अशा सर्व कारसेवकांना अयोध्येतील लोकांनी आपापल्या घरी निवास करण्यासाठी थांबविले आणि ज्या वेळेस हे कारसेवक श्रीराम जन्मभूमीकडे जायला निघाले babari-ayodhya त्यावेळेस विविध ठिकाणी तैनात असलेल्या सशस्त्र दलांनी मुलायम सिंगच्या आदेशाने या कारसेवकांवर कुठे लाठीचार्ज केला तर कुठे गोळीबार केला. ३० ऑक्टोबर १९९० व २ नोव्हेंबर १९९० हे श्रीराम जन्मभूमी मंदिर लढ्यातील काळे दिवस आहे. या दिवशी केवळ मुस्लिम तुष्टीकरणासाठी आणि आपले राजकारण साधण्यासाठी मुलायम सिंगाने या नि:शस्त्र कारसेवकांवर गोळीबाराचे आदेश दिले. babari-ayodhya अनेक कारसेवकांना शरयू नदीच्या पुलावरून नदीमध्ये फेकण्यात आले तर कोणाला रेतीचे पोते पाठीला बांधून पाण्यात टाकण्यात आले. कोणाला लाठ्याकाठ्यांनी रक्तबंबाळ करण्यात आले तर कोणावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये शेकडो कारसेवक मारले गेले.
 
 
कलकत्त्यावरून आलेले रामकुमार कोठारी व शरद कुमार कोठारी या कोठारी बंधूंवर मुलायम qसग यांच्या पोलिसांनी गोळीबार केला. यात हे दोनही सख्खे भाऊ हुतात्मा झाले. babari-ayodhya अयोध्येच्या गल्ल्या, रस्ते कारसेवकांच्या रक्ताने लाल झाले. अयोध्या निर्मनुष्य झाली. कारसेवकांचे आंदोलन चिरडण्यात आले. मुलायम सिंग खूश झाले. आपल्या तुष्टीकरणाच्या राजनीतीमध्ये आपण यशस्वी झालो, असे त्यांना वाटले. त्यावेळेस एका कवीने हे दृश्य पाहून अयोध्येच्या भिंतीवर लिहिले होते...
‘देश धर्म पर, मर मिटने की, जिनके मन मे चाह थी,
दो नवंबर को उनके लहू से रंगी हुई यह राह थी।'
babari-ayodhya मुलायम सिंगाला वाटले की, आपण बंदुकीच्या भरोशावर कारसेवकांचे आंदोलन चिरडले आहे. परंतु, कारसेवकांच्या रक्तातून संपूर्ण देशाने प्रेरणा घेतली. संपूर्ण देशातले हिंदू पुन्हा एकत्र झाले आणि त्यानंतर ठरले की, ६ डिसेंबर १९९२ ला आपण अयोध्येत कारसेवा करायची. यावेळेस मात्र ज्या मुलायम सिंगाने कारसेवकांवर गोळ्या झाडल्या होत्या, लोकांनी त्याला सत्तेवरून खाली खेचले होते आणि तेथे भाजपाचे कल्याणसिंग मुख्यमंत्री झालेले होते. babari-ayodhya कल्याणसिंग यांनी सर्वच पोलिस आणि इतर दलांना आदेश दिले होते की, कोणीही कारसेवकांवर गोळ्या झाडणार नाही. ६ डिसेंबरच्या दिवशी दुपारच्या वेळेला शरयू नदीतून एक एक मूठ वाळू आणून कारसेवा करायची, असे ठरले होते. परंतु, ज्या वेळेस कारसेवकांचे जत्थे श्रीराम जन्मभूमीकडे सरकू लागले.
 
 
त्यावेळेस सुरक्षा दलांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. ठिकठिकाणी कारसेवकांची धरपकड होत होती; त्याच वेळेस एक बस, ज्यामध्ये कारसेवकांना बंदी बनविण्यात आले होते, त्याच बसमध्ये बसले. babari-ayodhya एक साधू उठले आणि त्यांनी बसच्या ड्रायव्हरला बसमधून ढकलून दिले. स्वत: ते स्टेअरिंगवर बसले. त्यांनी बस सुरू केली आणि श्रीराम जन्मभूमीभोवती लावण्यात आलेले कठडे बसने तोडून टाकले व ती बस श्रीराम जन्मभूमीच्या आवारात पोहोचली. कठडे तुटताच हजारोंच्या संख्येने कारसेवकांनी श्रीराम जन्मभूमीकडे धाव घेतली आणि पाहता पाहता हजारोंच्या संख्येमध्ये कारसेवक त्या बाबरी ढाच्यावर चढले आणि मग कुठून तरी कुदळ आले, फावडे आले, babari-ayodhya जे जे हातामध्ये मिळेल ते ते सर्व आले आणि त्यांनी बाबरी ढाचा तोडायला सुरुवात केली आणि बघता बघता सूर्य मावळायच्या आत पूर्ण बाबरी ढाचा ध्वस्त झालेला होता. तेथे विटांनी बांधलेले छोटेसे राम मंदिरसुद्धा अस्तित्वात आलेले होते.
 
 
 
या देशामध्ये देशाच्या स्वातंत्र्यापासून हिंदू समाजाचा आवाज नेहमीच दाबण्याचे कार्य राजनीतिक लोकांनी केलेले आहे. हिंदूंना तुम्ही सेक्युलर आहात, तुम्ही सर्वधर्मसमभाव मानणारे आहात, तुम्ही शांत राहा अशा पद्धतीची शिकवण वारंवार देण्यात आली. आणि याचाच परिणाम म्हणून हिंदू अतिसहिष्णू झाले की, हिंदूंच्या देशांमध्ये हिंदूंच्याच आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रांचे मंदिर त्यांच्या जन्मभूमीवर ते बांधू शकले नाही. babari-ayodhya परंतु, ज्या वेळेला हिंदू समाज एकत्र झाला त्यावेळेला गुलामीचा बाबरी ढाचा तोडण्यात आला. साडेचारशे वर्षांच्या गुलामगिरीचा अंत हिंदू समाजाने केलेला होता. हे संघाने केले की विश्व हिंदू परिषदेने केले, यापेक्षा हे हिंदू समाजाने केले, असेच म्हणणे सर्व दृष्टिकोनातून योग्य आहे. बाबराशी केलेल्या लढाईचेसुद्धा महत्त्व होते आणि स्वकीयांशी केल्या गेलेल्या या लढाईचेसुद्धा महत्त्व नक्कीच आहे. babari-ayodhya त्यामुळे ६ डिसेंबर १९९२ हा दिवस भारताच्या इतिहासामध्ये हिंदू समाजाचा शौर्य दिवस म्हणून लिहिला जाईल, यात काहीच संशय नाही.
Powered By Sangraha 9.0