राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाची सांगता

30 Dec 2023 21:17:06
तभा वृत्तसेवा
कळंब, 
Rashtrasant Tukdoji Maharaj : या भारतात बंधुभाव बंधुभाव नित्य असू दे याकरिता गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम गुरुकुंज ग्रामगीता शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ आणि आमदार डॉ. अशोक उईके यांच्या पुढाकाराने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाची सांगता झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची समाजाला नितांत गरज असल्याने कळंब नगरीमध्ये साहित्य संमेलन 29 व 30 डिसेंबर रोजी साजरे झाले. दुसर्‍या दिवशी शनिवार, 30 डिसेंबरला या साहित्य संमेलनामध्ये ‘स्वर गुरुकुंजाचे’ हा कार्यक्रम अमोल बांबल यांनी सादर केला.
 
Rashtrasant Tukdoji Maharaj
 
‘नौजवान जाग जाना रे’ या कार्यक‘म ग्रामगीताचार्य प्रा. राजेंद्र वैद्य यांनी सादर केला. ‘नव्या युगाची युवकांसमोरील आव्हाने’ या विषयावर प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे व भारतीय विचार मंच विदर्भ प्रांत सहसंयोजक डॉ. सतपाल सोवळे यांनी मार्गदर्शन केले. ‘राष्ट्र सशक्तीकरणात युवकांचे योगदान’ या Rashtrasant Tukdoji Maharaj विषयावरील सत्रामध्ये मार्गदर्शक म्हणून ग्रा मगीताचार्य मंजूषा कौटकर आणि सत्राच्या अध्यक्ष म्हणून संत साहित्याच्या अभ्यासक प्रा. मंजिरी गंजीवाले यांनी विचार मांडले. दुपारी मु‘य मार्गदर्शक हरिभक्तपरायण शुकदास महाराज गाडेकर आणि साहित्यिक प्रा. सदानंद बोळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने या साहित्य संमेलनाचा समारोप झाला. या सत्रात ‘आसू आणि हसू’ या विषयावर प्रसिद्ध वर्‍हाडी कवी जयंत चावरे यांनी मार्गदर्शन केले.
 
 
‘माय असावी सार्‍याला’ या कवितेच्या माध्यमातून आईचे महत्व आपल्या जीवनात सांगत असताना जयंत चावरे ‘अंधार्‍या जीवनात आई आणते प्रकाश’ ही कविता सादर करत असताना श्रोतावर्ग आसवांनी भिजला होता. त्यानंतर त्यांनी बाप ही कविता व बाबाविषयी मनोगत व्यक्त करत असताना, ‘अथांग उंचावरून पडणारा नदीचा झरा म्हणजे बाप, जो कधी आटत नाही, या दुनियेत कोणी मोठा नाही बापासारखा’ ही ऐकत असताना उपस्थितांनी आपल्या अश्रूंना मोकळे करून दिले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश अडगुलवार यांनी केले. Rashtrasant Tukdoji Maharaj सामुदायिक प्रार्थनेवर यवतमाळच्या मानवता मंदिराचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले. या आगळ्यावेगळ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाची शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता सांगता झाली.
Powered By Sangraha 9.0