अक्षता कलश डोक्यावर घेऊन गेेले रामभक्त

*साई मंदिरात अयोध्या अवतरली
*उद्यापासुन घरोघरी अक्षता

    दिनांक :30-Dec-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Akshata Kalash : श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या अक्षतांचे वितरण 1 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान शहरातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आज 30 रोजी सायंकाळी साई मंदिर येथून शहरातील 166 अक्षता कलशाचे वितरण करण्यात आले. यावेळी साई मंदिरात अयोध्या अवतरल्याचा भास होत होता. Akshata Kalash  कलश हातात मिळताच रामभक्तांनी तो कलश मस्तकाला लावत डोक्यावर घेतला. जय श्री रामचा जयघोष करीत कलश शहरातील प्रत्येक भागात पोहोचला. त्या भागातही दिंड्या, मंगलवाद्यांच्या गजरात अक्षता कलशाचे स्वागत करण्यात आले.
 
Akshata Kalash
 
साई मंदिरात रामदरबारा उभा करून हनुमान चालिशाचे पठन करण्यात आले. यावेळी नगर संघ चालक डॉ. प्रसाद देशमुख, विहिंपचे जिल्हाध्यक्ष व साई मंदिरचे सचिव सुभाष राठी, विहिंपचे अटल पांडे, भाजपाचे शहर अध्यक्ष निलेश पोहेकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी अटल पांडे व सुभाष राठी यांनी अक्षतांच्या वाटपाची माहिती देत 22 रोजी वर्धेत दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. आज साई मंदिरातून घेतलेले Akshata Kalash कलश आपआपल्या परिसरातील राम मंदिरात ठेवणण्यात येणार असुन 1 जानेवारीपासुन घरोघरी अक्षता देत 22 रोजी रामललाच्या स्थापना कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे.
 
 
शहरात सोमवार 1 जानेवारी सकाळी 7 वाजता विठ्ठल मंदिर, सायंकाळी 6 वाजता साई मंदिर, मंगळवार 2 रोजी सकाळी 7 वाजता गाडगेबाबा मठ, सायंकाळी 6 वाजता राष्ट्रभाषा, बुधवार 3 रोजी सकाळी 7 वाजता तुळजाभवानी, सायंकाळी 6 वाजता तुकाराम वार्ड, गुरुवार 4 रोजी सकाळी 7 वाजता केळकरवाडी, सायंकाळी 6 वाजता व्यास मंदिर, शुक्रवार 5 रोजी सकाळी 7 वाजता ज्ञानेश्‍वर मंदिर, सायंकाळी 6 वाजता रामदास स्वामी मंदिर, Akshata Kalash शनिवार 6 रोजी सकाळी 7 वाजता समर्थ मंदिर, सायंकाळी 6 वाजता बिरसा मुंडा, रविवार 7 रोजी सकाळी 7 वाजता सुदामा, सायंकाळी 6 वाजता हरिकृष्ण, सोमवार 8 रोजी सकाळी 7 वाजता आंबेडकर, सायंकाळी 6 वाजता म्हसाळा, मंगळवार 9 रोजी सकाळी 7 वाजता टिळक पुतळा, सायंकाळी 6 वाजता लक्ष्मी मंदिर, बुधवार 10 रोजी सकाळी 7 वाजता गुरुगोविंद सिंग, सायंकाळी 6 वाजता बालाजी, गुरुवार 11 रोजी सकाळी 7 वाजता दयालनगर, सायंकाळी 6 वाजता गणेशनगर येथून घरोघरी अक्षत वाटपाला सुरुवात होणार आहे.