वर्ष सरत असताना नागपुरात 33 सक्रिय कोरोनाग्रस्त

31 Dec 2023 21:49:16
नागपूर, 
Nagpur corona : वर्ष सरत असतानाच नागपूर शहरात मागील 24 तासात पुन्हा कोरोनाच्या 11 बाधितांची भर पडली आहे. शुक्रवारी 11 बाधितांची भर पडली होती. शनिवारी पुन्हा तेवढीच भर पडल्याने गांभीर्याने विचार करीत प्रतिबंधक उपायांची कटाक्षाने अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागपुरात आढळला कोरोना नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण 
 
Nagpur corona
 
नव्या बाधितांची भर पडल्याने शहरातील सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या आता 33 वर पोहोचली आहे. यापैकी फक्त एकच रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची प्रकृती स्थिर असून ऑक्सिजनची गरज नाही. इतर घरीच विलगिकरणातअसल्याचे महापालिकेतील आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले. Nagpur corona याआधीच्या बाधितांचे जनुकीय चाचणी अहवाल अद्यापही मिळालेले नाहीत. शुक्रवारीसुद्धा 11 बाधितांची भर पडली. त्यामुळे चिंता वाढली असून काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुखाच्छादन, निरंतर स्वच्छता व भौतिक दूरता यांचे पालन करण्याचे आवाहन अधिकार्‍यांनी केले आहे.
 
 
सर्दी, खोकला व ताप असेल तर तातडीने कोरोना चाचणी करा आणि डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्या, आदी सूचना आरोग्य खात्याकडून देण्यात आल्या आहेत. Nagpur corona खामला, कामगारनगर, जयताळा, सोनेगाव, फुटाळा, डिक दवाखाना, सुदामनगरी वर्मा ले-आऊट, के.टी. नगर, हजारी पहाड, दाभासह सर्वच झोन्समधील महापालिकेची नागरी आरोग्य केंद्रे तसेच मेयो व मेडिकल रुग्णालयांसह 46 ठिकाणी चाचणी केंद्र सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0