डॉ. रवि व स्मिता कोल्हे यांना पुरस्कार

04 Dec 2023 20:38:48
तभा वृत्तसेवा
धारणी, 
Dr. Ravi and Smita Kolhe : आंतरराष्ट्रीय स्तरावर जनसेवेसाठी आणि आपल्या कर्तव्यक्षेत्रात अद्वितीय कार्य करणार्‍यांना देण्यात येणारा सीएसआर जरनल एक्सीलेंस अवॉर्ड-2023 मेळघाटातील पद्मश्री डॉ. रवि तथा डॉ. स्मिता कोल्हे यांना घोषित करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हिंदीचे प्रख्यात कवी कुमार विश्वास, क्रिकेट स्टार युवराज सिंग, महिला क्रिकेटर मिताली राऊत आणि प्रसिद्ध पॅडमॅन अरुणाचलम मुरुगानाथम या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त प्रतिष्ठितांना सुद्धा हा अवार्डप्रदान करण्यात येत आहे.
 
Dr. Ravi and Smita Kolhe
 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे रक्षामंत्री राजनाथसिंग पुरस्कार प्रदान करतील. 9 डिसेंबर रोजी मुंबईत स्टॉक एक्सचेंजच्या ऐतिहासिक इमारतीमध्ये सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मेळघाटात कुपोषण काळापासून Dr. Ravi and Smita Kolhe डॉ. रवि कोल्हे तथा स्मिता कोल्हे यांचे सामाजिक कार्य विशेष रुपाने प्रकाशझोतात आलेले होते. त्यांच्या जनसेवेच्या कार्याची दखल केंद्र शासनाने घेत पद्मश्री पुरस्कार दिला होता. आंतरराष्ट्रीय स्तराचे कवी कुमार विश्वास आणि क्रिकेटपटू युवराज सिंग यांना सुद्धा सीएसआर अवॉर्ड प्रदान करण्यात येत आहे.
 
 
मेळघाटातील सार्वजनिक आरोग्यावर काम Dr. Ravi and Smita Kolhe केल्यानंतर आता मेळघाटातील शेतीवर कोल्हे काम करीत आहेत. परंपरागत पिकांऐवजी फळ लागवडीसह विविध पिकांबद्दल नवनवीन प्रयोग ते करीत आहेत. अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कोल्हे दाम्पत्यास नवीन सीएसआर अवॉर्ड मिळत असल्याने मेळघाटसह संपूर्ण विदर्भात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Powered By Sangraha 9.0