मनिला :
earthquake फिलिपाईन्समध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर शक्तिशाली भूकंपाचे धक्के earthquake बसले. रिश्टर स्केलवर त्याची नोंद ६.८ इतकी करण्यात आली असून, यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले आहे.
सोमवारी पहाटे १ वाजून २० मिनिटांनी ६.८ तीव्रतेच्या भूकंपाचे earthquake धक्के जाणवले. त्याचे केंद्र मिंडानाओ येथे ८२ किमी खोलीवर होते. याआधी रविवारी सायंकाळी सुद्धा ५६ किमी खोलीवर ६.६ तीव्रतेचे धक्के बसले. दोन्ही घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. याशिवाय, शनिवारी ७.६ तीव्रतेच्या धक्क्यांत एका गर्भवतीचा मृत्यू झाला होता. तर, अन्य काही जण जखमी झाले होते.