आ.गायकवाड यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विराजमान

04 Dec 2023 19:56:53
बुलढाणा, 
Shivaji Maharaj : शहरातील संगम चौक येथे 51 फूट उंचीचा भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवस्मारक समितीचे कार्याध्यक्ष आ. संजय गायकवाड यांच्या भगीरथ प्रयत्नातून समस्त शिवस्मारक समिती तसेच सर्व समाजातील समाजबांधवांच्या उपस्थितीमध्ये असंख्य शिवभक्तांच्या साक्षीने दि. 4 डिसेंबर रोजी विराजमान झाला आहे. शिवभक्तांच्या साक्षीने शहरातील सर्व समाजातील संत महापुरुषांच्या स्मारकसमिती पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य विराजमान सोहळा पार पडला. यावेळी असंख्य शिवप्रेमी तसेच शिवस्मारक समितीचे सर्व पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित होते.
 
Shivaji Maharaj
 
शिवप्रेमींचे डोळे पाणावले...
शहरात अनेक वर्षापासून प्रलंबित व शिवप्रेमेच्या मनातील Shivaji Maharaj  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खूपच गांभीर्याचा जिव्हाळ्याचा होता वर्षानुवर्षापासून प्रतीक्षेत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आ. संजय गायकवाड यांच्या अथक प्रयत्नातून छत्रपती शिवरायांचा पुतळा क्रेन द्वारे उंच गगनाकडे झेप घेत असताना तसेच पुतळा अतिशय सुखरूप बुरुजावर स्थानापन्न झाला त्या क्षणी उपस्थित हजारो शिवप्रेमींचे डोळे पाणावले होते आता आपले स्वप्न पूर्ण झाले अशा भावना प्रत्येक शिवसैनिकाच्या व शिवप्रेमीच्या मनातून व्यक्त होत होत्या.
Powered By Sangraha 9.0