लडाख,
भारतीय लष्कराच्या स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या Geetika Kaul गीतिका कौल यांनी जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये तैनात होणारी Geetika Kaul पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनून इतिहास घडविला आहे. गीतिका यांनी सियाचीन बॅटल स्कूलमध्ये कठोर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर हे महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले आहे.
कॅप्टन Geetika Kaul गीतिका यांची छायाचित्रे शेअर करताना, भारतीय लष्कराच्या फायर अॅण्ड फ्युरी कॉप्र्सने सांगितले की, तिचे समर्पण, क्षमता आणि अडथळे पार करण्याची आणि राष्ट्रसेवेची भावना इतरांना प्रेरणा देण्यासाठी एक उदाहरण आहे. इंडक्शन ट्रेनिंग ही शारीरिक आणि मानसिक तग धरण्याची कठीण परीक्षा मानली जाते. यात उच्च प्रतीचे अनुकूलन, जगण्याची तंत्रे आणि कठोर परिस्थितीत काम करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या विशेष वैद्यकीय प्रक्रिया यासारख्या विविध पैलूंचा समावेश आहे.
हिमालयाच्या उत्तरेकडील भागात असलेले सियाचीन केवळ त्याच्या सामरिक महत्त्वासाठीच नाही तर, प्रतिकूल हवामान आणि आव्हानात्मक भूभागासाठीही ओळखले जाते. कॅप्टन गीतिका कौल Geetika Kaul यांची या अत्यंत विषम रणांगणात पहिली महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती हे भारतीय सैन्यात महिला समावेशाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारत संचार निगम लिमिटेडने ऑक्टोबरमध्ये सियाचीन ग्लेशियर येथे १५,५०० फुटांपेक्षा जास्त उंचीवर तैनात असलेल्या सैनिकांना मोबाईल संप्रेषणाचा विस्तार करण्यासाठी नवीन बेस ट्रान्सीव्हर स्टेशन कार्यान्वित केले आहे.