लोकनायक अभिवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर

05 Dec 2023 17:13:11
यवतमाळ, 
Lok Nayak Abhivachana केशव स्मृती वाचनालय आणि लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य राज्यस्तरीय लोकनायक ऑनलाईन कथा अभिवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत एकूण 22 स्पर्धकांनी आपले अभिवाचन सादर केले होते. सर्वच स्पर्धकांनी दमदार अभिवाचन सादर करून स्पर्धेत चुरस निर्माण केली. यामुळेच निकाल जाहीर करताना प्रत्येक क्र मांक विभागून जाहीर करण्यात आला आहे.
 
 
Lok Nayak Abhivachana
 
वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित सलग चौथ्यावर्षी या स्पर्धेत पहिल्या क‘मांकाचे बक्षीस 2 हजार 500 रुपये, दुसरे बक्षीस 1 हजार 500 रुपये तर तिसरे बक्षीस 1 हजार रुपये रोख असे होते. स्पर्धेचा निकाल जाहीर करताना प्रथम क्रमांक जयंत कर्णिक आणि रिया पवार, द्वितीय क्रमांकावर प्राची नाफडे आणि अनिता सुळे तर तृतीय क‘मांक डॉ अस्मिता दामले आणि देवेंद्र देशपांडे यांना विभागून जाहीर करण्यात आला. Lok Nayak Abhivachana सुशीला कर्णिक यांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर करण्यात आला. बक्षीस विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करताना सर्व स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. सर्व बक्षीसपात्र विजेत्यांना पुरस्काराची रक्कम ऑनलाइन माध्यमातून पाठवण्यात येईल, असे आयोजकांनी जाहीर केले आहे.
Powered By Sangraha 9.0