संत, धर्माचार्यांच्या संघटित प्रयत्नाने भारत विश्वगुरू होणार

जितेंद्रनाथ महाराज यांचे प्रतिपादन

    दिनांक :05-Dec-2023
Total Views |
शेगाव, 
world guru संत, धर्माचार्य आणि विश्व हिंदू परिषद यांनी एकत्रितपणे आपली शक्ती लावली तर भारत लवकरच विश्वगुरू world guru होईल, असा विश्वास देवनाथ पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज यांनी धर्माचार्य, धर्म चिंतन वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे आणि क्षेत्रमंत्री गोविंद शेंडे होते.
 
 
world guru
 
world guru विहिंपच्या महाराष्ट्र व गोवा राज्यातील धर्माचार्यांचा हा वर्ग १ ते ३ डिसेंबर या काळात शेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. श्री गजानन महाराज संस्थानच्या संपूर्ण सहकार्याने हा वर्ग पार पडला. संपूर्ण क्षेत्रातील १५० च्या वर संत, धर्माचार्य यात सहभागी झाले होते.
 
‘धर्माचार्यांची शक्ती मोठी आहे. world guru त्यामुळे त्यांची जबाबदारी देखील मोठी आहे. यासाठी ज्या रचना त्यांना उभ्या करायच्या आहेत त्याचा विचार, निर्णय आणि संकल्प आपण या वर्गात करावा', असे आवाहन जितेंद्रनाथ महाराज यांनी केले.
हिंदुस्थान बहुकेंद्री असल्यामुळेच अजिंक्य : मिलिंद परांडे
world guru दोन हजार वर्षांपासून जगावर प्रभुत्व मिळविण्याची लढाई सुरू आहे. यात अनेक देश, संस्कृती लयाला गेल्या. परंतु, भारतावर विजय मिळवणे त्यांना शक्य झाले नाही; कारण हिंदुस्थान हा कधीही एककेंद्री नव्हता. त्याची संरचना बहुकेंद्री असल्यामुळेच हिंदू संस्कृती अभिन्न राहिली, असे प्रतिपादन राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले. या सर्व रचनांचे मूल्य अपार आहे. या संत धर्मचार्य, मंदिरे यांच्या रचना जिवंत ठेवणे, इतकेच नाही तर, त्या अधिकाधिक समर्थ बनवणे, ही काळाची गरज आहे. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्हाला काय केले पाहिजे, करता येईल, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण, वेगवेगळ्या प्रकाराने समाजात वैचारिक भ्रम निर्माण करण्याचे, बुद्धिभेद करण्याचे कार्यक्रम चालतात. त्याला आजच्या भाषेत, आजच्या प्रश्नांना धरून आणि आजच्या पिढीला समजेल, अशा भाषेत आमचे तत्त्वज्ञान, आमचा मूळ विचार पुन्हा पुन्हा प्रभावीपणे मांडण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही मिलिंद परांडे यांनी केले.