नागपूर,
nagpur-cyclone-railway दक्षिणेत मिचाँग चक्रीवादळाने चेन्नईसह इतर शहरात धुमाकूळ घातल्याने रेल्वे वाहतूकीला फटका बसला आहे. दक्षिणेकडून येणार्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. nagpur-cyclone-railway याशिवाय सोमवार व मंगळवारी विमानतळावर पाणीच पाणी असल्याने विमानसेवा बंद ठेवावी लागली. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने काही मार्गावर रेल्वे वाहतूक बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. nagpur-cyclone-railway मुसळधार पावसामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने 145 रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.
![nagpur-cyclone-railway nagpur-cyclone-railway](https://www.tarunbharat.net/Encyc/2023/12/5/railway-f-f_202312051727076671_H@@IGHT_400_W@@IDTH_600.jpg)
यात प्रामुख्याने मध्यवर्ती नागपूरमार्गे धावणार्या 40रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. nagpur-cyclone-railway या सर्व रेल्वे गाड्या 7 डिसेंबरपर्यंत सुरुवात होणार्या स्थानकापासूनच रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना तिकीट परतावा रक्कम घेता येणार आहे. दक्षिणेतील चक्रीवादळाने अनेक रेल्वेगाड्यांच्या वाहतूकीला फटका बसला आहे. nagpur-cyclone-railway यात प्रामुख्याने जीटी एक्स्प्रेस, केरला एक्स्प्रेस, तामिळनाडू एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, चेन्नई - छपरा-चेन्नई एक्स्प्रेस, चेन्नई- जयपूर- चेन्नई एक्स्प्रेस यासारख्या अनेक प्रवासी गाड्यांचा समावेश आहे.
रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने येणार्या गाड्यांची माहिती आरक्षित श्रेणीच्या तिकिटांसाठी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर नियोजित तारखेनुसार एसएमएसद्वारे पाठविली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. nagpur-cyclone-railway नागपूर मार्गे 6 व 7 डिसेंबर दरम्यान धावणार्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.यात प्रामुख्याने ट्रेन नंबर 03251, 03252, 03358, 06509, 12269, 12270, 12295, 12296, 12511, 12512, 12615, 12616, 12612, 12612, 12612, 12612 2651, 12652, 12656, 12655, 12669, 12670, 12655 , 12968, 12957, 16093, 16094, 16787, 16788, 22648, 22647, 22674, 22673. या गाड्यांचा समावेश आहे. nagpur-cyclone-railway