तभा वृत्तसेवा
वर्धा,
Rojgar Melava : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने नागपूर येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 9 व 10 डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथील परिसरातील जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजता दरम्यान नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये 10 हजार पेक्षा जास्त कुशल, अकुशल आणि अर्धकुशल तांत्रिक, अतांत्रिक क्षेत्रातील प्रोफेशनल रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मेळाव्यात दहावी, बारावी, पदवी, आयटीआय, पदव्युत्तर इत्यादी विविध शैक्षणिक पात्रताधारक नोकरी इच्छुक उमेदवार सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी मुलाखतीस येताना आपल्या शैक्षणिक व Rojgar Melava अनुभवाचे मुळ प्रमाणपत्र सोबत आणावे. तसेच बायोडाटाच्या छायांकित प्रती सोबत ठेवाव्या. उमेदवारांच्या बायोडाटांची छाननी करुन मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात येईल. तसेच उद्योजकांमार्फत प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांना शोर्टलिस्टेड करण्यात येईल. उमेदवार नोंदणी सुरु झालेली असून उमेदवारांनी आभासी नोंदणी करावी.
या राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्यास राज्यातील नामांकित उत्पादन तसेच सेवा क्षेत्रातील विविध कंपन्या सहभागी होणार आहे. मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांकरिता स्वयंरोजगाराच्या Rojgar Melava संधी उपलब्ध होण्यासाठी विविध महामंडळाचे स्टॉल्स उपलब्ध असणार आहे. मेळाव्यात सुमारे 50 हजार उमेदवारांची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग नोंदवावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.