रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सात हजार जणांना निमंत्रण

07 Dec 2023 20:44:23
अयोध्या, 
Ram temple पुढील वर्षी २२ जानेवारीला पार पडणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील दिग्गज कलाकार, साहित्यिक, Ram temple धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रातील सात हजार जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला नव्या राम मंदिराचे उद्घाटन करतील आणि त्यांच्या हस्ते रामललाचा अभिषेकही केला जाईल.
 
 
Ram temple
 
Ram temple श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाने दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अभिनेता अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह जवळपास सात हजार जणांना रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे. याशिवाय दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘रामायण' मालिकेत भगवान श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आले. Ram temple या कार्यक्रमासाठी १९९२ मध्ये हुतात्मा झालेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. आमंत्रित अती महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, योगगुरू रामदेव बाबा, उद्योगपती रतन टाटा, गौतम अदानी यांचा समावेश आहे.
मंदिर आंदोलनात सहभागी नेत्यांना पहिले निमंत्रण
Ram temple राममंदिर आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपाचे बडे नेतेही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दिसणार आहेत. लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले. याशिवाय विविध धर्मगुरूही रामललाच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यात केवळ हिंदूच नव्हे तर, जैन धर्मातील मुनींचाही समावेश करण्यात आला आहे. जैन मुनी आचार्य लोकेश मुनी यांनाही मंदिर न्यासाने कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
‘या' खेळाडूंनाही निमंत्रण
Ram temple रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी देशातील प्रसिद्ध फुटबॉलपटू बायचुंग भुतिया, मुष्टियोद्धा मेरी कोम, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, पी. गोपीचंद, क्रिकेटपटू रोहित शर्मा, सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड यांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0