गोंदिया,
MLA Agarwal : जिल्ह्यात 28 नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे धान व अन्य पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात आ. विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी प्राप्त होताच, आज 7 डिसेंबर रोजी आ.अग्रवाल MLA Agarwal यांनी प्रशासनासह शेतकर्यांच्या शेतात पोहोचले व प्रशासनाला निर्देश दिले.
जिल्ह्यात 28 नोव्हेंबरपासून सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे गोंदिया तालुकासह गोंदिया जिल्ह्यातील शेतकर्यांचे धान व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात आ.विनोद अग्रवाल MLA Agarwal यांनी 29 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गोंदियातील झालेल्या धान पिकाच्या नुकसानीची बाब निर्देशनास आणून देत निवेदनाच्या माध्यमातून तातडीने नुकसानीची पंचनामे करून शेतकर्यांना मदत करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने त्याच दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आ.विनोद अग्रवाल यांनी गोंदियाच्या तहसीलदारांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानुसार, तहसीलदारांनी ग्रामसेवक, तलाठी, कृषिसेवक यांना गावे वाटप करून तातडीने पंचनामा करण्याचे आदेश काढले. तरी सुद्धा अनेक गावातील ग्रामसेवक आजही संबधीत गावात पोहचले नसल्याची तक्रार प्राप्त होताच आज, 7 डिसेंबर रोजी आ.विनोद अग्रवाल यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी, खंडविकास अधिकारी, पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले व शेतकर्यांसह शेतामध्ये जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच सर्व प्रकारच्या धान पुंजण्याचे व उभ्या धान पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून एकही नुकसान ग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी असे MLA Agarwal निर्देश दिले. अन्यथा प्रशासन जवाबदार असेल अश्या कडक सुचना देखील प्रशासनाला केल्या. प्रसंगी तहसीलदारांनी धान व इतर पीकाच्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्याचे आश्वासन दिले.