कारंजा अपघातात तीन गंभीर जखमी

08 Dec 2023 17:44:21
कारंजा लाड,
Karanja accident : दुचाकी अपघातात दोन जण तर ट्रॅव्हल्स मधून खाली पडल्याने एक जण गंभीर जखमी झाला. अपघाताची ही घटना कारंजा मूर्तिजापूर मार्गावरील वेदांत शाळेजवळ ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता च्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार एक खाजगी ट्रॅव्हल्स कारंजाहून मुर्तीजापुर कडे जात असताना ट्रॅव्हल्सच्या दारात उभ्या असलेल्या इसमाचा तोल गेला आणि तो खाली पडून गंभीर जखमी झाला. एवढ्यात मागून येणार्‍या दुचाकी चालकाचे त्यामुळे नियंत्रण सुटले आणि दुचाकी वरील दोघेजण सुद्धा खाली पडून गंभीर जखमी झाले.
 
Karanja accident
 
इमाम मुन्नीवाले (वय २२) असे खाजगी ट्रॅव्हल्स मधून खाली पडल्याने जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते कारंजा शहरातील रहिवासी आहे तर दुचाकीहून खाली पडल्याने भारत राजाराम देवळे व संजय शंकर गवई हे दोघेजण गंभीर जखमी झाले. हे दोघेही कारंजा तालुयातील शेवती येथील रहिवासी आहेत. Karanja accidentअपघाताच्या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक विनोद खोंड यांनी जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणी दरम्यान प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
Powered By Sangraha 9.0