गोवारी शहीद स्मारकाच्या विद्रुपीकरणाचा प्रयत्न

09 Dec 2023 22:46:05
- आदिवासी समाजात रोष, पोलिसात तक्रार

गोंदिया, 
शहरातील छोटा गोंदिया परिसरातील गोवर्धन चौकात लोकापर्णासाठी तयार असलेल्या Adivasi Gowari shahid Smarak आदिवासी गोवारी शहिद स्मारकाचा काही समाजकंटकांकडून विद्रुपीकरणाचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे आदिवासी समाजात रोष व्यक्त होत असून याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
 
Adivasi Gowari shahid Smarak
 
छोटा गोंदिया परिसरातील आदिवासी बांधवांची परिसरात Adivasi Gowari shahid Smarak गोवारी शहीद स्मारक तयार करण्याची मागणी होत होती. दरम्यान, स्मारक बांधकामासाठी शासनातर्फे निधी प्राप्त झाल्यावर स्मारकाचे बांधकाम करण्यात आले. आता केवळ लोकार्पणाची प्रतिक्षा आहे. मात्र, मागील दोन दिवसापासून काही समाजकंटकांकडून स्मारकाचे विद्रुपीकरणाचा प्रयत्न होत आहे. 8 डिसेंबर रोजी अज्ञातांनी स्मारकाचे टाईल्स, रोलिंग पाईप यांची तोडफोड केली. तोच प्रकार 9 डिसेंबर रोजी देखील घडला. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत असून याप्रकरणी आदिवासी गोवारी समाज संघटनेचे शहर अध्यक्ष सुशिल राऊत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच स्मारकाच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने बंदोबस्त करावा व स्मारकाच्या सुरक्षेसाठी आवारभींत तयार करून सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने शहर अध्यक्ष सुशिल राऊत यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0