धीरज प्रसाद साहू यांना अटक करा : बाबुलाल मरांडी

09 Dec 2023 18:30:26
रांची,
Babulal Marandi आयकर विभागाने काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज प्रसाद साहू यांच्या मालकीच्या विविध ठिकाणांवर छापेमारी करीत बेहिशेबी २९० कोटी रुपयांपेक्षा अधिकची रोख जप्त केली. या प्रकरणी त्यांना Babulal Marandi अटक करण्यात यावी, अशी मागणी झारखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी केली आहे.
 
 
Babulal Marandi
 
आयकर विभागाच्या ओडिशा स्थित बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांच्या छापेमारीत आतापर्यंत २९० कोटी रुपयांपेक्षा अधिकची बेहिशेबी रोख जप्त करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. Babulal Marandiबाबुलाल मरांडी म्हणाले की, एवढी मोठी रोख जप्त होणे धक्कादायक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. या रकमेचा काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांसोबतच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी संबंध असल्याचा आरोप मरांडी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एका वृत्तपत्राची बातमी शेअर केली असून, १०० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी ‘एक्स'वर लिहिलेल्या पोस्टमध्ये, देशवासीयांनी चलनी नोटांच्या या ढिगाऱ्यांकडे पाहावे आणि नंतर त्यांच्या नेत्यांचे प्रामाणिक ‘भाषण' ऐकावे. जनतेचा लुटलेला पै-पै त्यांना परत करावा लागेल. हीच मोदी गॅरंटी असल्याचे त्यांनी म्हटले.
 
Powered By Sangraha 9.0