भंडारा,
Kanchan Gadkari : आज घरातील संवाद बंद झाला व घर मुकी झाली आहेत. सुसंस्कृत आणि सुदृढ पिढी घडविण्याचे स्वप्न पाहत असताना हे चित्र चिंतनीय आणि क्लेशदायी असे आहे. स्त्री आई म्हणून कुठेतरी कमी पडते आहे. सुदृढ सशक्त आणि समृद्ध राष्ट्राची सुरुवात ही घरापासून व्हावी आणि एक आईच हे आव्हान समर्थपणे पेलू शकते. तेव्हा आयांनो कठोर होऊन भूमिका घ्या, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी केले.
महिला समन्वय विभागाच्या वतीने ‘समर्पिता संगम’ या जिल्हास्तरीय महिला संमेलनाचे आयोजन आज ९ रोजी भंडारा येथील स्प्रिंगडेल शाळेच्या प्रांगणात केले होते. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महिला समन्वय विभागाच्या प्रांत संयोजिका मीरा कडबे, तुमच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मीता राव, महिला समन्वय विभाग संयोजिका कांचन ठाकरे, जिल्हा संयोजिका दीपा नायर उपस्थित होत्या. दीप प्रज्वलनाने संमेलनाची सुरुवात झाली. प्रास्ताविकातून कांचन ठाकरे यांनी संमेलन आयोजनामागची भूमिका विषद केली. यावेळी उपस्थित हजारोच्या संख्येतील मातृशक्तीला संबोधित करताना कांचन गडकरी म्हणाल्या, भारतीय चिंतनात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सुरू असलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आणि अभिनंदन आहेत.
भारतीय व्यवस्थेत कुठेही स्त्री किंवा पुरुष प्रधान संस्कृती असा उल्लेख नाही. ही संस्कृती धर्मप्रधान आणि समाजाला पोषक असे अपेक्षित देणारी आहे. एका स्त्रीला आयुष्यात अनेक भूमिका वटवाव्या लागतात. एक स्त्री म्हणून आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि तेवढीच समाज घडविण्यासाठी पोषक असल्याचे त्या म्हणाल्या. आज स्त्रिया पुरुषांच्या सोबतीने प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. स्त्री-पुरुषांपेक्षा कधीच कनिष्ठ नाही. पण स्त्रीने स्वतःला स्त्री म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. तिने स्त्रीत्व कधीही सोडू नये असेही त्या म्हणाल्या. सृजनत्वाचे वरदान परमेश्वराने केवळ माती आणि स्त्रीला दिले आहे. जसे मातीतून काहीही उगवू शकते तसेच स्त्री ही एक सुदृढ संपन्न पिढी घडविण्याची क्षमता ठेवते. स्त्रीचे स्त्री तू हेच तिचे सत्व आहे, आणण्याचा प्रयत्न झाल्यास, तिची उन्नती होईल मात्र यातून विकृत स्त्री जन्माला येईल असेही कांचन गडकरी म्हणाल्या.
आज समाजात घडणाèया घटना पाहता आई म्हणून आपण संस्कार करायला कुठेतरी कमी पडतो असे वाटू लागले आहे. समाजात नवीन पीडित येणारे विकृत भावना का यावी? याचाही विचार होणे गरजेचे आहे. जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तसेच स्त्रियांवर अत्याचार होत असतील तर नक्कीच आई म्हणून आम्ही कमी पडतो आहे, याची जाणीव प्रत्येक स्त्रीने ठेवायला हवी. बदलत्या जगासोबत पाश्चिमात्य करण्याचा पगडा आमच्यावर पडला आहे, हे उघड आहे. मुला मुलींची आईचा संपलेला संवाद विभक्त कुटुंब पद्धती या विकृत मानसिकतेला जन्मास घालत असल्याचे सांगताना आज घरे मुकी झाली आणि संवाद संपला अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली. आई म्हणून कठोर भूमिका घेत कुटुंब जपा. संवादातूनच नातं घट्ट होईल त्यामुळे संवाद वाढवा असे कळकळीचे आवाहनही यावे कांचन गडकरी यांनी केले. दिवसभर चाललेल्या या संमेलनात विविध विषयांवर वेगवेगळ्या व्यक्तींकडून उद्बोधन करण्यात आले. संचालन शुभांगी ऋषी यांनी केले.
जोपर्यंत आर्थिक स्वातंत्रता किंवा संपन्नता तुमच्या वाटला येणार नाही, तोपर्यंत स्त्रीचे महत्त्व अधोरेखित होणार नाही. आर्थिक संपन्नता आल्यास निर्णय क्षमता आपोआप तुमच्या हाती येते. महिलांसमोर अनेक आव्हाने आहेत ती पेलण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे होणे गरजेचे असल्याचे मत उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मीता राव यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.