भारताची जीडीपीतील वृद्धी परिवर्तनात्मक सुधारणांचे प्रतिबिंब

09 Dec 2023 20:40:52
गांधीनगर, 
GDP growth चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारताचा जीडीपी ७.७ टक्क्यांनी वाढला, हे देशाच्या मजबूत होत असलेल्या GDP growth अर्थव्यवस्थेचे आणि मागील १० वर्षांत झालेल्या परिवर्तनात्मक सुधारणांचे प्रतिबिंब आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
 
 
GDP growth
 
GDP growth आमचे सरकार गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीला (गिफ्ट) नव्या युगाच्या जागतिक वित्तीय आणि तंत्रज्ञान सेवांचे जागतिक तंत्रिका केंद्र बनवू इच्छित आहे, असे गिफ्ट सिटी येथे व्हिडीओ लिंकद्वारे ‘इन्फिनिटी फोरम २.०' ला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारताने ७.७ टक्के GDP growth जीडीपी विकास साधला आहे. आज संपूर्ण जगाच्या भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत आणि हे केवळ एकट्याने घडलेले नाही. हे केवळ भारताच्या बळकट होत असलेल्या अर्थव्यवस्थेचे आणि मागील १० वर्षांत केलेल्या परिवर्तनात्मक सुधारणांचे प्रतिqबब आहे, असे मोदींनी उद्घाटन सोहळ्याला संबोधित करताना सांगितले. भारत आज जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या फिनटेक बाजारपेठांपेकी एक आहे आणि गिफ्ट इंटरनॅशनल फायनान्शियर सव्र्हिसेस सेंटर त्याचे केंद्र म्हणून उदयास येत आहे, असे मोदी यांनी सांगितले. गुजरातच्या गरबा नृत्याचा समावेश युनेस्कोच्या यादीत करण्यात आल्याने नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील लोकांचे अभिनंदन केले.
 
Powered By Sangraha 9.0