चामोर्शी,
Madhukar Bhandekar : संतांचे आचार-विचार हे समाजातील प्रत्येक घटकांनी आचरणात आणून ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व समाजाला दिशा देण्याकरिता संत जगनाडे महाराज यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मधुकर भांडेकर यांनी केले. तालुक्यातील वालसरा येथील संताजी स्नेही मंडळाच्यावतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजप्रबोधन, किर्तन व हळदी कुंकु कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून तुषार दुधबावरे, दीप प्रज्वलन पोलिस पाटील भगीरत पाटील भांडेकर, तंमुस अध्यक्ष गजानन सातपुते, ग्रापं सदस्य शालिनी शेट्ट्ये तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रापं सदस्य देविदास गव्हारे, सुभाष कोठारे, आनंदराव कोहळे, देवाजी भांडेकर, मारुती भांडेकर, रघुनाथ भांडेकर, प्रभुजी बारसागडे, गणेश कोपुलवार, गजानन पाटील मुलकलवार, खुशाल पाटील मुलकलवार, उमेश कुमरे, रमेश सातपुते, पंढरी बुरांडे, गुणवंत वासेकर आदी उपस्थित होते.
यावेळी पोलिस भरतीमध्ये निवड झालेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यात प्रियंका रमेश सातपुते, विवेक पंढरीनाथ बुरांडे यांचा समावेश होता. श्री संत संताजी तेली महिला समाज संघटना वालसराच्यावतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून आजूबाजूच्या परिसरातील महिला भगिनींना भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाला महिला समाज संघटनेच्या अध्यक्ष अर्चना वासेकर, उपाध्यक्ष योगिता सातपुते, सचिव योगिता भांडेकर, सहसचिव निराशा सातपुते, कोषाध्यक्ष अनिता भांडेकर, कार्याध्यक्ष लता घोंगडे, सदस्य रेखा कोठारे आशा शेटे, शालिनी शेटे, जयश्री कोठारे, जयश्री कोठारे, गीता वैरागडे, चंदा गव्हारे, नरेश शेटे, रामचंद्र भांडेकर, महेश सातपुते, भिकाजी दुधबळे, दीपक भांडेकर, कृष्णदेव भांडेकर, हरिदास भांडेकर, प्रवीण कोठारे, साईनाथ भांडेकर, रमेश सातपुते आदींसह परिसरातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हरीश नंदनवार, साईनाथ भांडेकर तर आभारप्रदर्शन सुधीर गायकवाड यांनी केले.