- आमदार समीर कुणावार यांची मागणी
हिंगणघाट,
महाराष्ट्रातील प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या लोकांना जास्त घरकुलाचा लाभ व्हावा म्हणून मोदी आवास योजना ही मागच्या मार्च महिन्यामधील अधिवेशनात जाहीर केली. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये बर्याच ओबीसीधारकांना अजून घरकुलं मिळाले नाही. परंतु, वर्धा जिल्ह्यामध्ये 14 हजार 865 घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. परंतु, हे लक्षांक कमी असल्याने ते वाढवून देण्यात यावे, या मागणीचे निवेदन Sameer Kunawar आ. समीर कुणावार यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांना दिले.
मोदी आवास योजना घरकुल अंतर्गत मोदी आवास प्लस यादी आणि मोदी आवासमध्ये रिजेक्ट झालेली यादी हे जे दोन मोदी आवास प्लसमध्ये असलेले लाभार्थ्यांची यादी आणि मोदी आवासपासुन 36 हजार 698 लाभार्थी वंचित आहे. वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या ग्रामपंचायती अंतर्गत आणि त्यामुळे यामध्ये शासनाने आकडा गृहीत धरला नसावा असा संशय आ. कुणावार यांना आला. त्यांनी याची पूर्ण तपासणी केली असता त्यात 36 हजार 698 लाभार्थी उद्दिष्ट असून वर्धा जिल्ह्याला केवळ 14 हजार 865 घरकुलाच उद्दिष्ट मंजूर झालेले आहे. त्याची प्रत्यक्ष यादी आणि प्रस्ताव घेऊन आ. समीर कुणावार यांनी आ. सावे यांची भेट घेऊन वर्धा जिल्ह्यामध्ये मोदी आवास घरकुल योजनेंतर्गत सन 2023-24 च्या जिल्ह्यामध्ये 36 हजार 698 एवढी ही प्रलंबित लाभार्थ्यांची यादी आहे. मोदी आवास प्लस तसेच मोदी आवास मध्ये रिजेक्ट झालेले आणि काही लोक सर्वे मधून व काही लोक ज्यांचं नाव सर्वे मधून आपोआप बाद झालेला आहे असे सुद्धा लाभार्थी आहे आणि यांची सुद्धा आकड्यांची संख्या 36 हजार 698 एवढी असून त्या यादीच्या प्रमाणामध्ये 14 हजार हा आकडा अतिशय कमी असल्याचे लक्षात आणून देत वर्धा जिल्ह्याच उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी मागणी केली. ना. सावे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने चौकशी करून घरकुलाचे उद्दिष्ट वाढवण्याबाबत आश्वासन दिले. घरकुलाचे उद्दिष्ट वाढवणे अत्यंत गरजेचे असून यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे Sameer Kunawar आ. कुणावार यांनी कळवले आहे.