Madhya Pradesh भाजपाच्या १६३ नवनिर्वाचित आमदारांची बैठक सोमवारी केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत होणार असून, त्यात Madhya Pradesh मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
१७ नोव्हेंबर रोजी Madhya Pradesh मध्यप्रदेश विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. २३० सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपाने १६३ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला ६६ जागांवर समाधान मानावे लागले. Madhya Pradesh मध्यप्रदेश विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यासाठी भाजपाने हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, ओबीसी मोर्चाचे प्रमुख के. लक्ष्मण आणि महामंत्री आशा लाक्रा यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.
Madhya Pradesh मध्यप्रदेश भाजपा मीडिया सेलचे प्रमुख आशिष अग्रवाल यांनी शनिवारी वृत्तसंस्थेला सांगितले की, केंद्रीय निरीक्षक सोमवारी नवनियुक्त आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहतील. बैठक सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही बैठक रविवारी होणार होती; मात्र निरीक्षकांच्या व्यस्ततेमुळे ती सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. निरीक्षक रविवारी सायंकाळी कींवा सोमवारी सकाळी मध्यप्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या १९ वर्षांत भाजपाने राज्यात केंद्रीय निरीक्षक पाठविण्याची ही तिसरी वेळ आहे.