इसरायली जवानांमध्ये पसरतोय ''शिगेला'' आजार !

09 Dec 2023 15:20:06
नवी दिल्ली,
 
shigella-isreal इस्रायल, पॅलेस्टाईन आणि हमासच्या धुमश्चक्रीत सामान्य लोकांसोबत सैन्याच्या जवानांचेही हाल होतायत. त्यातच, गाझामध्ये लढणाऱ्या इस्रायली सैनिकांमध्ये गंभीर आजार पसरत असल्याचं वृत्त आलं आहे. shigella-isreal या आजाराचं नाव शिगेला असून रणांगणातील अस्वच्छता आणि दूषित अन्नामुळे हा आजार पसरत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. गाझामध्ये तैनात असलेल्या सैनिकांमध्ये पोटाचा गंभीर आजार आढळून आला असून या आजाराचं नाव शिगेला आहे. shigella-isreal शिगेलाग्रस्त सैनिकांना क्वारंटाईन करून उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. रोगाचा प्रसार वेगाने होण्यामागे एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे गाझामधील सैनिकांना पाठवलं जाणारं अन्न ! shigella-isreal इस्रायली नागरिक हे अन्न तयार करून पाठवत आहेत. या अन्नात शिगेला आणि इतर हानिकारक जीवाणूंचा संसर्ग झाला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे.
 
 
shigella-isreal
 
अन्नाची ने-आण करताना ते अन्न संसर्गयुक्त झालं असावं किंवा नासलं असावं किंवा सैनिकांनी ते गरम न करताच सेवन केलं असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. shigella-isreal आता सैनिकांना केवळ कोरडे खाद्यपदार्थ पाठवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यात, हवाबंद डब्यातील अन्न, बिस्किटं, प्रोटिन असलेले पदार्थ आणि सुकामेवा वगैरे पदार्थांचा समावेश आहे. शिगेला हा एक जीवाणूंचा प्रकार असून तो शरीरात गेल्यावर आमांश होतो, ज्याला "शिगेलोसिस" म्हणतात. shigella-isreal या आजाराच्या लक्षणांमध्ये ताप येणं, जुलाब आणि त्यातून रक्त पडणं, पोटात तीव्र वेदना आणि शरीरात पाण्याची कमतरता जाणवण्याचा समावेश आहे. ज्या लोकांची प्रकृती फारशी चांगली नाही किंवा रोगप्रतिकारक शक्ती एचआयव्हीसारख्या आजारांमुळे कमी झाली आहे, अशांना या रोगाचा दीर्घकाळ त्रास होऊ शकतो. या रोगावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यूदेखील होतो.
 
 
shigella-isreal हा जीवाणू रक्तात गेल्यास मृत्यूचा धोका आणखी वाढतो. लहान मुले, एचआयव्हीचे रुग्ण, मधुमेह किंवा कर्करोगाने ग्रस्त लोक आणि कुपोषित लोक याला सहज बळी पडतात. शिगेला संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्काद्वारे पसरतो. शिगेला हा संसर्गजन्य आजार असून, बाधितांच्या विष्ठेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला शिगेलाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.  shigella-isreal त्यात, शिगेला संसर्ग झालेल्या व्यक्तीने स्वयंपाक करणे, पिण्याचे पाणी सांडपाण्यामुळे दूषित, संक्रमित व्यक्तीने वापरलेल्या शौचालयांच्या संपर्कात आल्यास, शिगेला संक्रमित मुलांच्या चड्डी/लंगोट बदलताना, लैंगिक संबंधादरम्यान संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यास या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. शिगेला सामान्यतः बेघर लोकांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये, समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्यांमध्ये हा रोग आढळतो.shigella-isreal
 
 
जगभरात दरवर्षी ८ कोटी ते १७ कोटी लोक शिगेलामुळे प्रभावित होतात आणि वेळीच उपचाराअभावी सहा लाख लोकांचा यामुळे मृत्यू होतो. शिगेलाचे मृत्यू बव्हंशी आफ्रिकन आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये नोंदवण्यात आले असून 60% मृत्यू हे पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे आहेत. shigella-isreal नियमित हात धुणे, स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी हात धुणे, शौचालयातून  आल्यानंतर किंवा छोट्यांचे डायपर बदलल्यानंतर, लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी, पुरेशा प्रमाणात पाणी पिऊन आणि विश्रांती घेतल्याने बहुतेक रुग्ण बरे होतात. मात्र, इस्रायली सैनिकांकडे या सुविधा उपलब्ध नाहीत. पुरेसा पाणी पुरवठा नाही, साबण किंवा जंतुनाशक उपलब्ध नाहीत, कोरडे अन्न खाणे या सगळ्या परिस्थितीमुळे इसरायली सैनिकांमध्ये शिगेलाचा संसर्ग शब्दशः ''शिगेला'' पोहचला आहे.  shigella-isreal
Powered By Sangraha 9.0