नागपूर,
winter session 2023 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यानही शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी कायम ठेवली असून हे प्रकरण निर्णायक वळणावर असताना आज शिंदे गटाचे खा. राहुल शेवाळे यांची उलट तपासणी घेण्यात आली. winter session 2023 ही सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घ्यायचा आहे. winter session 2023 त्यामुळे हिवाळी अधिवेशन काळात सुनावणीला वेग आलाय. शुक्रवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आ. दिलीप लांडे आणि योगेश कदम यांची उलट तपासणी घेतली.
त्यानंतर आज खा. राहुल शेवाळे यांची उलट तपासणी घेण्यात आली. winter session 2023 आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी निरंतर सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या दिलीप लांडे आणि योगेश कामत यांना ठाकरे गटाच्या वकिलांनी उलट तपासणी दरम्यान प्रत्येकी शंभराहून अधिक प्रश्न विचारले होते. त्याचप्रमाणे आज खा. राहुल शेवाळेंवरही प्रश्नांचा भडिमार केला. winter session 2023 एकच प्रश्न अनेकदा विचारला गेल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हरकत घेत एकच प्रश्न वारंवार का विचारता, असा प्रश्नही अॅड. कामत यांना विचारला.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर घेतलेल्या बैठकीत शिंदे गटातील एकूण 23 आमदारांच्या स्वाक्षर्या असल्याची बाब उद्धव गटाचे वकील देवदत्त कामत यांनी काल सुनावणीदरम्यान उघड केली. winter session 2023 हजेरीपटावर या आमदारांच्या स्वाक्षर्या असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावर शिंदे गटाचे आ. योगेश कदम आणि दिलीप लांडे यांनी या स्वाक्षर्या आधीच घेण्यात आल्या होत्या, असे सांगितले. आजची सुनावणीची प्रक्रिया संपली असून आता सोमवारी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांची उलट तपासणी केली जाणार आहे. winter session 2023 त्यानंतर उदय सामंत आणि दादा भुसे यांचा नंबर आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार दिलीप लांडे, योगेश कामत, खा. राहुल शेवाळेंची उलट तपासणी पूर्ण झाली आहे.