पर्यायी खतांसाठी ‘पीएम-प्रणाम’ योजनेची घोषणा

01 Feb 2023 20:11:04
नवी दिल्ली, 
पर्यायी खतांना चालना मिळावी यासाठी (PM-Pranam) राज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्रधानमंत्री-प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्युट्रियंट्स फॉर अ‍ॅगि‘कल्चर मॅनेजमेंट’ अर्थात् पीएम-प्रणाम योजना (PM-Pranam) सुरू केली जाणार आहे, अशी घोषणा निर्मला सीतारामन् यांनी आज बुधवारी संसदेत केली. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल. देशात 30 कौशल्य आंतरराष्ट्रीय केंद्रे स्थापित केली जातील आणि लाखो तरुणांना कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 देखील सुरू केली जाईल, असे सीतारामन् यांनी सांगितले.

PM-Pranam
 
2021 मध्ये सरकारने (PM-Pranam) देशातील तरुणांना 300 पेक्षा जास्त अधिक कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून रोजगारक्षम कौशल्यांसह सक्षम करण्यासाठी आपल्या प्रमुख कौशल्य विकास योजनेचा तिसरा टप्पा सुरू केला. ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ वस्तू आणि जीआय उत्पादनांच्या जाहिरात आणि विक्रीसाठी युनिटी मॉल स्थापन करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहित केले जाईल, असे सीतारामन् यांनी सांगितले. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार ‘चॅलेंज मोड’द्वारे 50 स्थळे निवडणार असल्याचे सीतारामन् यांनी सांगितले. सरकारची जुनी प्रदूषणकारी वाहने भंगारात काढण्यासाठी सरकार पुरेसा निधीही देत आहे. वाहन भंगार धोरण 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. (PM-Pranam) प्रदूषणकारी वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यासाठी हे धोरण मदत करेल आणि अर्थव्यवस्थेला चालना देईल.
 
 
‘‘शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची (PM-Pranam) मते मिळविण्याचा विचार करून अर्थसंकल्प सादर करताना त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज आहे. अर्थसंकल्पात फलोत्पादन, सहकारसारख्या विभागाला तुटपुंजी मदत जाहीर केली. कापूस उत्पादकांना भरघोस मदत करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली, मात्र ऑस्ट्रेलियातून कापूस आयातीचा निर्णय दुटप्पी सरकारने घेतला.’’
अंबादास दानवे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते
  
 
‘‘निर्मला सीतारामन् यांनी सादर केलेला अर्थसंकल्प (PM-Pranam) हा कल्याणकारी असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. श्रम, शेतकरी, सूक्ष्म व लघुउद्योग विकासाचे स्तंभ आहेत. अर्थसंकल्पात या तिनही पैलूंना योग्य ते महत्त्व देण्यात आले आहे. पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिल्याने अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. आमच्या काही मागण्या पूर्ण केल्याबद्दल सीतारामन् यांचे आभार मानतो.’’
रवींद्र हिमते, भारतीय मजदूर संघाचे महामंत्री
Powered By Sangraha 9.0