प्रगटदिनोत्सव निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

    11-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
गोंदिया, 
स्थानिक डब्लींग ग्राऊंड परिसरातील श्री संत गजानन महाराज (Gajanan Maharaj) स्मारक संस्थेतर्फे गजानन महाराज प्रगटदिनोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले आहे.
 Gajanan Maharaj 
 
आज, 11 फेब्रुवारीपासून (Gajanan Maharaj) प्रगटदिनोत्सवाला सुरुवात झाली. सकाळी 7 वाजता श्रींचा जलाभिषेक, आरती व प्रसाद वितरण करण्यात आले. रात्री 9 वाजता श्री हनुमान चालीसाचे पठण झाले. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता श्रींचा अभिषेक व आरती तसेच सायंकाळी 4.30 वाजता श्रींची पालखी व शोभायात्रा काढण्यात येईल. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता श्रींचा अभिषेक, सत्यनारायण पुजा व आरती तसेच सायंकाळी 4.30 वाजता नागपूरचे पियुषबुवा धुमकेकर, भजियापार येथील नानीकराम टेंभरे यांचे सुश्राव्य किर्तनाचे कार्यक्रम तथा संध्याकाळी 7 वाजता प्रसाद वितरण करण्यात येईल.
 
 
14 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता श्रींचा अभिषेक व आरती तसेच सायंकाळी 4.30 वाजता पियुषबुवा धुमकेकर यांचे सुश्राव्य किर्तनाचे होईल. यावेळी जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल यांचा सत्कार करण्यात येईल. संध्याकाळी 7 वाजता गोपालकाला प्रसाद वितरण करण्यात येईल. 15 फेब्रुवारी रोजी दासनवमी निमित्ताने सकाळी 9 वाजता शिवशक्ती यज्ञ, दुपारी 1 वाजता नागपुरचे सद्गुरुनाथ महाराजांच्या हस्ते पूर्णाहुती, व 2 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.