भारताला डब्ल्यूटीसी अंतिम फेरीची आशा

11 Feb 2023 20:49:49
- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताची स्थिती सुधारली

नवी दिल्ली, 
नागपुरात व्हीसीए Jamtha Stadium जामठा स्टेडियमवर शनिवारी बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात तिसर्‍याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव व 132 धावांनी दणदणीत विजय नोंदविला. या विजयाबरोबरच भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) गुणतालिकेतील आपली स्थिती सुधारली आहे. अव्वल दोन संघ डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.
 
 
11feb8857
 
2021-23 डब्ल्यूटीसी चक्रातील 15 सामन्यांमध्ये नवव्या विजयासह भारताची गुणांची टक्केवारी 58.92 वरून 61.66 वर गेली. दरम्यान, गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाने आपली आघाडी कायम राखली असला तरी त्यांच्या गुणांची टक्केवारी 75.55 वरून 70.83 टक्के अशी कमी झाली आहेे. Jamtha Stadium भारताला आपली डब्ल्यूटीसी पात्रता स्थिती मजबूत करण्यासाठी श्रीलंकेकडून होणारा धोका टाळावा लागेल. मार्च महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान श्रीलंका संघ आपली टक्केवारी 60 टक्क्यांपेक्षा अधिक वाढवू शकेल.
 
 
श्रीलंकेच्या सर्वोत्तम संभाव्य निकालापूर्वी (61.11) भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली, तर भारताला 61.92 टक्के गुणांसह ऑस्ट्रेलियन संघासोबत अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यास पुरेसे आहे. जर भारत-ऑस्ट्रेलिया मालिका 2-2 ने बरोबरीत राहिली, तरी 56.4 टक्के गुणांसह भारत दक्षिण आफ्रिकेच्या शक्य तितक्या पुढे राहण्यास मदत होईल. श्रीलंकेचे न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत गुण कमी झाले, तर भारताला पात्र ठरण्यासाठी ते पुरेसे असेल. जर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-0 किंवा 4-0 ने जिंकल्यास Jamtha Stadium भारताला डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्यास मदत होईल आणि दुसर्‍या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात चुरस सुरू होईल.
ऑस्ट्रेलिया डब्ल्यूटीसी अंतिम फेरीसाठी अपात्र ठरू शकतो?
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पुढील तीन कसोटी अनिर्णीत ठेवल्यास किंवा तीनही सामन्यात विजय मिळववियात अपयशी ठरल्यास श्रीलंकेला (53.33) अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याची संधी मिळेल, मात्र त्याकरिता श्रीलंकेला आगामी मालिकेत न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करावा लागेल.
Powered By Sangraha 9.0