सुप्त गुणांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर विद्यार्थी घडतो : नंदा बांगर

    11-Feb-2023
Total Views |
चिखली, 
मुलांच्या अंगी असलेले सुप्त गुणांना (Latent Qualities) योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग असे भरारी घेतो आणि त्याच्या या भरारीने पालक देखील आनंदी होतात असे मार्गदर्शन नंदा बांगर यांनी केले.
 
Latent Qualities
 
विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यात वाटचाल करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि ही गरज लक्षात घेऊन दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेत बालसंस्कार केंद्र आणि शिक्षण अभियान जीवन विद्या मिशन मुंबई यांच्या वतीने मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 10 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांसाठी तर 11 फेब्रुवारीला पालकांसाठी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष सतीश गुप्त, शाळेच्या पालक संचालिका ज्योत्स्ना गुप्ता, दि. चिखली अर्बन उद्देशीय संस्था यांचे सचिव आशुतोष गुप्ता, शाळेच्या शैक्षणिक संचालिका पूजा गुप्ता, शाळेचे प्राचार्य गौरव शेटे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सुनीता गायकवाड समिती सदस्य त्याचप्रमाणे नंदा बांगर समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना आपले अमूल्य असे मार्गदर्शन दिले.
 
 
नंदा बांगर यांनी सांगितले जीवनाकडे पाहण्याचा सामान्य लोकांचा दृष्टिकोन दैववादी, प्रारब्धवादी ,नशीबवादी असा असतो. यशस्वी जीवन जगणे ही एक कला असून जीवन संगीताचे सात स्वर म्हणजेच जग ,कुटुंब ,शरीर ,इंद्रिय बहिर्मन ,अंतर्मन व परमात्मा. माणसाला हाताळता आले तर त्याचे जीवन संगीतमय होते समाजचे भवितव्य बहुतांशी त्याच्याच हातात असते कारण निसर्गाने माणसाला पूर्ण कर्म स्वातंत्र्य बहाल केले आहे आणि कर्म स्वातंत्र्याचा उपयोग कसा करायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. अन्य कोणीही नाही .म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे त्यांनी सांगितले. या विशेष मार्गदर्शनाच्या वेळी पालकांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती व आनंदी पालकत्व कसे साधता येईल हे या मार्गदर्शनाच्या माध्यमातून सर्वांना कळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन भारती राजपूत केले. व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.