भारताचा महत्त्वाचा भूभाग असलेल्या जम्मू-काश्मिरात मौल्यवान अशा Lithium reserves लिथियम धातूचा साठा आढळल्याने आधुनिक उद्योग क्षेत्रात भारताचे भाग्य तीव‘ गतीने बदलणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. याशिवाय, उत्पादनात भारताला अन्य देशांमध्ये तिसरे स्थान मिळण्याचे संकेत आहेत. आयात खर्च कमी होणार असून, विदेशी चलनांची बचत होणार असल्याचेही सांगण्यात येते. देशातील भूवैज्ञानिकांनुसार, देशात पहिल्यांदाच तब्बल 59 लाख टन इतका लिथियम धातूचा साठा सापडला आहे. आतापर्यंत अन्य देशांवर अवलंबून असलेला भारत आता जगात चिली आणि ऑस्ट्रेलियानंतर पहिल्याच प्रयत्नात तिसर्या स्थानी आला आहे. त्यामुळे पुढील काळात निश्चितच भारताचे आयातीसंबंधी समीकरण बदलणार आहे.
आतापर्यंत देशात आपली गरज भागविण्यासाठी 96 टक्के Lithium reserves लिथियम आयात करण्यात येत आहे. यावर विदेशी चलन अधिक प्रमाणात खर्च करावे लागते. भारताने 2020-21 मध्ये लिथियम ऑयर्न बॅटरीच्या आयातीवर 8,984 कोटी रुपये केले. 2021-22 मध्ये त्यात वाढ होऊन 13,838 कोटींवर आयात खर्च पोहोचला. ही आयात चीन आणि हाँगकाँगकडून सर्वाधिक केली जाते. यात चीनकडून होणारी आयात 80 टक्के इतकी आहे. परंतु, आता हाती आलेला लिथियम साठा हा चीनमधील एकूण साठ्यापेक्षा चौपट आहे. 2030 पर्यंत नियोजित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भारताला प्रतिवर्ष सुमारे 1 कोटी लिथियम बॅटरी उत्पादन करावे लागणार आहे.
आत्मनिर्भरतेला मिळाली शक्ती
जगभरातील Lithium reserves लिथियम साठा पाहता, लहानसा चिली देश 93 लाख टनांसह पहिल्या स्थानी, ऑस्ट्रेलिया 63 लाख टनांसह दुसर्या स्थानी आहे. आता भारत 59 लाख टनांसह तिसर्या स्थानी आला आहे. यानंतर अर्जेंटिना 27 लाख टन, चीन 20 लाख टन, अमेरिका 10 लाख टन अनुक‘मे चौथ्या, पाचव्या, सहाव्या स्थानी आहे. विशेष असे की, काश्मीर खोर्यात लिथियमचा शोध लागण्याअगोदर बॅटरी उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने भारताने अर्जेंटिना, चिली, ऑस्ट्रेलिया आणि बोलिविया यासार‘या लिथियम उत्पादक देशांच्या खाणींमध्ये भागीदारी खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. दुसरीकडे, काही आफि‘कन देशांनीही भारताकडून उधारीच्या बदल्यात लिथियमसह अन्य काही धातू खनिजांच्या खाणींमध्ये भारताला भागीदारी देण्यास तयार आहेत. परंतु, आता 59 लाख टन लिथियम साठ्यामुळे देशाच्या आत्मनिर्भरतेला शक्ती मिळणार, यात दुमत नाही.