भारतीय लष्कराचे रुग्णालय तुर्कीसाठी वरदान

    12-Feb-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
तुर्कस्तान व सीरियामध्ये झालेल्या (Indian Army hospital) भूकंपामुळे मोठे नुकसान झाले. जगातील अनेक देश दोन्ही देशांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. अशा मदतकार्यात भारत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. भारताने तुर्कस्तान व सीरियाला अत्यावश्यक सामुग्रीसह बचाव पथके पाठविली आहेत तसेच भारतीय लष्कराच्या 60 पॅराफिल्ड हॉस्पिटल पथकाने भूकंपग‘स्तांची निःस्वार्थ सेवा केली आहे. त्यांची या सेवेसाठी जगभरातून प्रशंसा होत आहे. भारताचे हे वैद्यकीय पथक दोन्ही देशांमध्ये अडकलेल्या लोकांना सतत मदत करीत आहे.
 
Indian Army hospital
 
यापूर्वीसुद्धा संकटकाळात (Indian Army hospital) भारतीय लष्कराच्या 60 पॅराफिल्ड हॉस्पिटलच्या पथकाने विविध देशांमध्ये सेवा दिली आहे. 1950 ते 1954 दरम्यान कोरियन युद्धादरम्यान भारताच्या या वैद्यकीय पथकाने तिथे देवदूत म्हणून काम केले होते. कोरियन युद्धादरम्यान वैद्यकीय पथकाने 2 लाखांहून अधिक लोकांवर उपचार केले. कोरियन युद्धादरम्यान भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांना पाठिंबा दिला, ज्या अंतर्गत भारतीय सैन्याचे वैद्यकीय पथक, 60 पॅराफिल्ड हॉस्पिटल तैनात करण्यात आले होते व त्याचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल ए. जी. रंगराज यांच्याकडे होते. कोरियातील दोन विभागांत ही सेवा दिली होती.
 
 
20 नोव्हेंबर 1950 रोजी 60 पॅराफिल्ड (Indian Army hospital) हॉस्पिटलचे एक पथक पुसान येथे दाखल झाले व 29 नोव्हेंबर 1950 रोजी, कोरियन युद्धात त्याची पहिली तैनाती प्योंगयांगमध्ये झाली. वैद्यकीय पथकाची दोन गटांत विभागणी करण्यात आली होती.