अय्यापा मंदिरात विक्रमी दान मंदिरात दान करण्याची अनोखी पद्धत!
13-Feb-2023
Total Views |
कोची,
केरळमधील सबरीमाला येथील भगवान Ayyapa Temple अय्यप्पाच्या प्रसिद्ध मंदिराला यावेळी विक्रमी दान मिळाले आहे. मंदिराला सुमारे 351 कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. मंदिर व्यवस्थापनाने नाणी मोजण्यासाठी ६०० कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे, मात्र अद्याप मोजणी पूर्ण झालेली नाही. नाणी मोजताना कर्मचार्यांची दमछाक होऊ लागल्याने त्यांना काम आटोपून काही काळ विश्रांती देण्यात आली.
अहवालानुसार, 60 दिवसांचा Ayyapa Temple मंडलम-मकरविलक्कू महोत्सव नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाला. यामध्ये भगवान अयप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पोहोचले. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिल्याने दानाचे पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तुटल्याचे सांगण्यात आले. त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचे प्रमुख के. अनंत गोपाल यांनी सांगितले की, नोट मोजण्याच्या मशीनने नाणी मोजणे शक्य नाही. अय्यप्पा मंदिरातही नाण्यांच्या रूपात करोडो रुपयांचा प्रसाद मिळतो. मंदिरात प्रसाद म्हणून येणारी नाणी एका मोठ्या स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नाण्यांचा मोठा डोंगर दिसतो. यासोबतच मंदिराला प्रसाद विक्रीतूनही भरपूर उत्पन्न मिळते. उत्सवादरम्यान मंदिरातून प्रसाद म्हणून अरावण आणि अप्पम दिले जातात. अप्पमची हुंडी 100 रुपयांना मिळते. मंदिरात येणारे लाखो भाविक हा प्रसाद विकत घेतात, ज्यातून खूप पैसा गोळा होतो.