विराट आणि स्मृतीमध्ये एक ‘खास’ कनेक्शन

    13-Feb-2023
Total Views |
नवी दिल्ली,
महिला प्रीमियर लीगच्या लिलावाला (Virat and Smriti) सुरुवात झाली आहे. या लिलावात स्मृती मंधाना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये 3.4 कोटी रुपयांना सामील झाली आहे. त्याचबरोबर या लिलावात ती सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. आरसीबीकडून खेळणे स्मृती मंधानासाठी खूप खास असणार आहे. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली यानेही पुरुषांच्या आयपीएलमध्ये या फ्रँचायझीसाठी खेळात आला आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली, स्मृती मंधाना आणि आरसीबी यांच्यातील खास कनेक्शनबद्दल आज जाणून घेऊया...
 
Virat and Smriti
 
विराट आणि मंधानाची जर्सी क्रमांक-18विराट कोहलीनंतर (Virat and Smriti) भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना महिला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहे. आरसीबीमध्ये सामील झाल्यापासून स्मृती आणि विराट यांच्यातील स्पेशल कनेक्शनची चर्चा सर्वत्र सुरु आहे. खरंतर, विराट कोहली टीम इंडियासोबत खेळताना 18 नंबरची जर्सी घालतो. त्याचवेळी स्मृती मानधना देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना 18 क्रमांकाची जर्सी घालते. अशा परिस्थितीत, 18 क्रमांकाची जर्सी दोघांमध्ये एक विशेष बाब आहे. पुरुषांच्या आयपीएलमध्ये आरसीबीला अद्याप विजेतेपद मिळवता आलेले नाही. अशा परिस्थितीत स्मृती महिला प्रीमियर लीगमधील फ्रेंचायझीची ही प्रतीक्षा संपवू इच्छित आहे.
स्मृतीवर सर्वात मोठी बोली
लिलावात सर्वात पहिले नाव (Virat and Smriti) स्मृती मंधाना यांचे होते, जिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3 कोटी 40 लाख रुपये देऊन त्यांच्या संघात समाविष्ट केले. या लिलावासाठी सर्व संघांकडे जास्तीत जास्त 12 कोटी रुपयांची उपलब्धता आहे. स्मृती मानधनाचे नाव येताच आधी मुंबईने हात वर केले आणि नंतर बंगळुरूनेही तिच्यासाठी बोली लावली. काही सेकंदातच स्मृतीची बोली अडीच कोटींच्या पुढे गेली. पण शेवटी आरसीबीने विजय मिळवला आणि तिला आपल्या संघात समाविष्ट केले.
 
Virat and Smriti
 
 
विराट आणि स्मृती दोघेही आरसीबीचे कर्णधार ?
विशेष म्हणजे विराट कोहली (Virat and Smriti) आरसीबीचा कर्णधारही राहिला आहे. तर स्मृती मंधानाकडेही पहिल्या सत्रात आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. अशा परिस्थितीत स्मृती मंधाना आणि विराट कोहली सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. स्मृती मंधानाने तिच्या टी-20 कारकिर्दीत 112 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तिन् 2651 धावा केल्या आहेत. यादरम्यान स्मृतीने 20 अर्धशतकांच्या खेळी केल्या आहेत.