मुंबईत हापूस आंब्याची विक्रमी आवक

14 Feb 2023 19:09:25
मुंबई, 
यंदा मुंबईकरांना (Mumbai Hapus mango) भरपेट हापूस आंबे खाता येणार, असे चित्र दिसत आहे. दोन वर्षे कोरोनामुळे कोकणातील हापूस आंबे मुंबईत अपेक्षित प्रमाणात पोहोचू शकले नव्हते, त्यामुळे मुंबईकर आंब्यापासून वंचित झाले होते. मात्र, आता कोरोनाही संपला आहे आणि नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची मोठी आवक झाली आहे.
 
Mumbai Hapus mango
 
आज मंगळवारी वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातून 9 टेम्पो आले, त्यातून तब्बल 479 हापूस आंब्याच्या पेट्या आल्या. इतर राज्यांतून 2 टेम्पो आले आणि त्यातून 100 आंब्याच्या पेट्या आल्या आहेत. त्यामुळे यंदा (Mumbai Hapus mango) मुंबई आणि महामुंबई येथे आंब्याची विक्री जोरात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, डिसेंबरमध्ये पहिली पेटी आली होती, तिला 50 हजार रुपये भाव मिळाला होता. आता जेवढी आवक झाली आहे, तेवढी आवक एप्रिल महिन्यापासून होत असते, परंतु दोन महिन्यांच्या आतच इतकी आवक झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आंब्याचा सिझन सुरू होईल तेव्हा मुंबईत आंब्याची आवक बरीच होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आवक वाढल्यामुळे दरही कमी होतील, त्यामुळे सर्वसामान्यांना कोकणातील आंबे खाण्याचा आनंद घेता येईल, असे एपीएमसी मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0