नवी दिल्ली,
केजरीवाल सरकारच्या उत्पादन शुल्क घोटाळ्यात सध्या तिहार कारागृहात बंद (Satyendra Jain) मंत्री सत्येंद्र जैन यांची सीबीआयने तिहार कारागृहात जाऊन चौकशी केली. जैन यांच्या चौकशीसाठी सीबीआयने मागील शुक्रवारी विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज सोमवारी मंजूर करण्यात आल्यानंतर सीबीआयने जैन यांची चौकशी केली, अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली.
दारूचे ठेके देण्याशी संबंधित असलेल्या केजरीवाल सरकारच्या उत्पादन शुल्काच्या धोरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचे उघड झाल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल करून, दिल्लीतील विविध राज्यांमध्ये छापेमारी केली होती. यानंतर (Satyendra Jain) सत्येंद्र जैन यांच्यासह काही व्यावसायिक व दलालांना अटक करण्यात आली होती.