मुंबई,
Big Boss 16 बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा नुकताच रंगला आणि त्यात शिव ठाकरे आणि MC Stan एम.सी.स्टॅन या दोन मित्रांमध्ये जेतेपदासाठी चुरस होती. उत्सुकता बरीच ताणल्यानंतर, MC Stan एम.सी.स्टॅनला विजेता जाहीर करण्यात आले. लोकांनी सर्वाधिक मतदान स्टॅनला MC Stan केल्यामुळे तो विजेता ठरल्याचे सांगण्यात आले. चर्चेत असलेल्या नावांऐवजी काहीसा लाजरा, महागडे जोडे घालणारा आणि आपल्या आगळ्याच शब्दसंग्रहामुळे चर्चेत आलेला स्टॅन MC Stan विजेता ठरला.
कोण आहे एम.सी.स्टॅन? MC Stan
एम.सी.स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख MC Stan असे आहे. पुण्यातल्या ताडीवाला रोड या भागात बालपण गेलेल्या अल्ताफचे वय २३ वर्षे आहे. गुन्हेगारी पृष्ठभूमी असलेल्या या वस्तीत वाढलेल्या अल्ताफने सातव्या वर्गात असतानाच रॅपर होण्याचे ठरवले. आपण नोकरी करावी किंवा इंजिनियर वगैरे बनावे, असे त्याला कधीच वाटले नाही. MC Stan मोठ्या भावामुळे अल्ताफला संगीताची गोडी लागली. सायबर कॅफेत बसून अल्ताफने रॅप संस्कृतीविषयी समजून घेतले. MC Stan हिपहॉप शैलीचीही त्याला गोडी लागली. MC Stan रॅप आणि हिपहॉप हे फास्ट ट्रॅक असणारे गायन प्रकार त्याला आवडत असतानाच दुसरीकडे पारंपरिक कव्वालीचे सूरही त्याला खुणावत होते. सूर-ताल समजून मग गाण्यासाठी ते उपयोगी ठरले. MC Stan त्याच्या एकूणच गायनशैलीवर कव्वालीचा प्रचंड प्रभाव आहे.
Tadipar ‘तडीपार' या प्रोजेक्टमधून सहा गाणी आणि सहा व्हिडिओच्या माध्यमातून त्याने आपली गोष्ट चाहत्यांसमोर मांडली. त्यात त्याचे बालपण, पोलिस, प्रसिद्धी, चाहते आणि मग पुण्याहून मुंबईला येणे! MC Stan बोलण्याच्या रांगड्या ढंगामुळे स्टॅन लोकांचे लक्ष वेधून घेतो. स्टॅनचे शेमडी आणि मंडळी हे अस्सल मराठी शब्द चांगलेच लोकप्रिय झाले. MC Stan त्याला इन्स्टाग्रामवर ७.८ मिलिअन फॉलोअर्स आणि युट्यूबवर त्याच्या मिलियनव्ह्यूज आहेत. MC Stan पण, तो स्वत: कोणालाही फॉलो करत नाही. देशातल्या अव्वल रॅपर्सबरोबर स्टॅन गाणी सादर करतो.