'या' तीन दिवशी ताजमहालात मिळणार मोफत प्रवेश

15 Feb 2023 14:43:52
आग्रा, 
मुघल सम्राट शाहजहानच्या 368 व्या उर्स (पुण्यतिथी) निमित्त, आग्रा येथील (Taj Mahal) ताजमहालमध्ये 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान प्रवेश विनामूल्य असणार आहे. यानिमित्ताने पर्यटकांना शाहजहाँ आणि मुमताजच्या थडग्याही पाहायला मिळतील, जेथे सामान्य दिवसांमध्ये लोकांना भेट देण्याची परवानगी नसते. समितीचे अध्यक्ष इब्राहिम झैदी यांनी इंडिया टुडेला सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाहजहानचा उर्स १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या तीन दिवसांसाठी यात्रेकरू आणि पर्यटकांना (Taj Mahal) ताजमहालमध्ये प्रवेश विनामूल्य असेल.

Taj Mahal
 
माहितीनुसार, 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता 'घुसल' (विविध विधी आणि प्रार्थना करण्यापूर्वी संपूर्ण शरीराच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया) विधी सुरू होईल. त्याचबरोबर 18 फेब्रुवारी रोजी संदल आणि मिलाद शरीफचे विधी साजरे केले जाणार आहेत. 19 फेब्रुवारी रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत 'कुल' (कुराणच्या चार मूलभूत अध्यायांचे पठण) (Taj Mahal) आणि 'चादर पोशी' (चादर अर्पण) हे विधी पाळले जातील.
 
यावर्षी उर्सच्या निमित्ताने शाहजहानच्या कबरीला 1,450 मीटर लांबीची चादर अर्पण करण्यात येणार आहे. यानंतर आवारातच लंगरचे वाटप करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते समीर यांच्या म्हणण्यानुसार, उर्सच्या निमित्ताने (Taj Mahal) ताजमहाल येथे मोठी गर्दी होणार आहे, त्यामुळे असामाजिक तत्वांनी स्मारक खराब होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. इंडिया टुडेशी संभाषणात समीर म्हणाले की, उर्सच्या व्यवस्था समितीला ASI सोबत काम करावे लागेल. कारण ताजमहाल हा केवळ आग्रासाठीच नाही तर, संपूर्ण देशासाठी एक अद्वितीय वारसा आहे.
 
या वस्तू नेण्यास परवानगी नाही
ताजमहालमध्ये (Taj Mahal) सिगारेट, बिडी, पान-मसाला, कोणत्याही प्रकारचे ध्वज, बॅनर किंवा पोस्टर लावण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर पुस्तके, स्क्रू ड्रायव्हर, लायटर, चाकू यांसारख्या वस्तू नेण्यासही मनाई आहे.
Powered By Sangraha 9.0