राष्ट्रधर्म यज्ञातील दिव्य समिधा - श्रीगुरुजी गोळवलकर

golwalkar guruji आज विजया एकादशी श्रीगुरुजींचा जन्मदिन!

    16-Feb-2023
Total Views |
आदरांजली  
- प्राचार्य प्र. श्री. डोरले
रा. स्व. संघाचा परिचय golwalkar guruji
RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना आज जगविख्यात आहे. प. पू. केशव बळीराम हेडगेवार Keshao Baliram Hedagewar यांनी ‘हिंदुत्व हेच येथील राष्ट्रीयत्व' आहे, या महान ऐतिहासिक सिद्धांतावर संपूर्ण हिंदू समाजाचे धर्मरक्षण-देवरक्षण आणि संस्कृती रक्षणासाठी आणि भारतमातेला पुनर्वैभवाप्रत नेण्यासाठी इ. स. १९२५ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूरला रा. स्व. संघाची स्थापना केली. सन १९४० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. १५ वर्षे सातत्याने, अथक परिश्रमाने सर्व प्रांतांमध्ये संघ शाखांचा प्रारंभ झाला होता. संपूर्ण हिंदू - राष्ट्रांचा हा चिमुकला वृक्ष आपल्या हाताने त्यांनी द्वितीय सरसंघचालक म्हणून golwalkar guruji  मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांचे स्वाधीन केला. त्या छोट्याशा वृक्षाचे golwalkar guruji  श्रीगुरुजी यांनी सन १९४० ते १९७३ या सुमारे तीन तपात एका विशाल वटवृक्षात रूपांतर केले. आज केवळ भारतातच नव्हे, तर जगातील इतरही अनेक देशांमध्ये या वटवृक्षाच्या पारंब्या, दैनिक शाखेच्या रूपाने किंवा  हिंदुत्व, भारतीयत्व यांना पूरक असलेल्या विविध नावाने पोहोचल्या आहेत.
 
 
rss
 
golwalkar guruji  रा. स्व. संघ ही संस्था या अर्थाने जगप्रसिद्ध झाली आहे. याचे श्रेय प. पू. श्रीगुरुजींच्या कुशल संघटन कौशल्य, सर्वांगीण विकासाची प्रगल्भ सांस्कृतिक दृष्टी, अचूक निर्णयक्षमता, तीक्ष्ण, सर्वस्पर्शी, तलस्पर्शी प्रतिभा, अफाट लोकसंग्रह, सम्यक दृष्टिकोन, उदात्त ध्येयवाद, विरक्त जीवन आणि त्याचबरोबर ऋषी-मुनींच्या जीवनातून दृढमूल झालेली पारंपरिक अडिग दैवी श्रद्धा, या गुण समुच्चयाने मंडित झालेल्या नेतृत्वाला आहे. golwalkar guruji  आज संपूर्ण देशभर त्यांचा जन्म उत्साहाने संपन्न होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनाचे चिंतन, आयुष्यभर त्यांनी मांडलेला विचार, तत्त्वज्ञान आणि त्याच संदर्भात भारतीय संस्कृतीचाही म्हणजे सांस्कृतिक मूल्ये आणि जीवनमूल्ये यांचाही मागोवा घेण्याची गरज आहे.
 
श्रीगुरुजींचे जीवन चरित्र golwalkar guruji
श्रीगुरुजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा, प्रचंड व्यापाचा आवाका आणि त्यांना लाभलेल्या कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितीचा व्यत्तास लक्षात घेतला तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. golwalkar guruji  एका अत्यंत सामान्य कुटुंबात कोकणातील गोळीवली गावातील पाध्ये यांच्या कुळात जन्म. वडील सदाशिवराव ऊर्फ भाऊजी तार आणि टपालखात्यात कामठीला नोकरी करणारे. पुढे त्यांनी शिक्षण क्षेत्रात, महाकोशल विभागात सरायपली येथे शिक्षकी पेशा स्वीकारला. मातोश्री ताई नागपूरच्या रायकर यांच्या घरातील. या सात्त्विक दाम्पत्याच्या पोटी श्रीगुरुजींचा जन्म विजया एकादशी म्हणजे माघ वद्य एकादशी शके १८२७, दिनांक १९ फेब्रुवारी १९०६ रोजी पहाटे साडेचार वाजता झाला. त्यांचे नाव ‘माधव' ठेवण्यात आले. golwalkar guruji  घरातील लोक त्यांना प्रेमाने मधु असे म्हणत. तो आई-वडिलांचा अतिशय लाडका होता. त्याला कारणही तसेच होते. त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या अपत्यांमधील हाच एकमेव ‘वंश-तंतु' जगला होता. गोळवलकर वंशाचा हाच एकमेव कुलदीपक होता. golwalkar guruji  सर्वांच्या आशा-आकांक्षा त्याच्यावरच केंद्रित झाल्या होत्या. पण त्यांना काय कल्पना होती की, हाच त्यांचा ‘मधु' भविष्यकाळात ‘श्रीगुरुजी' golwalkar guruji  या नावाने जगविख्यात होऊन लौकिक मातेचेच नव्हे, तर प्रत्यक्ष ‘भारत मातेचेही' पांग फेडण्याइतपत कर्तृत्व गाजवेल म्हणून!
 
 
श्रीगुरुजींचे आध्यात्मिक परिवर्तन golwalkar guruji 
प्रतिकूलतेवर मात करीत, विषम परिस्थितीलाही नामोहरम करीत सर्वश्रेष्ठ महापुरुषांच्या जीवनात समानपणे दिसून पडणाèया उपजत आणि जन्मगत दिव्य संस्कारांच्या प्रभावाने पू. श्रीगुरुजींचे जीवन उन्नत, विकसित झालेले आहे. golwalkar guruji  स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे- A Powerful Stream makes its own way या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले लौकिक शिक्षण संपवून काशी विश्वविद्यालयात बी.एस्सीचे विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. काशी विश्वविद्यालयातील प्रवेश म्हणजे त्यांच्या भावी जीवनाच्या, पारमार्थिक जीवनाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे वळण ठरले, असेच म्हणावे लागेल. golwalkar guruji  त्यांच्या पूर्वजन्मातील सुप्त आध्यात्मिक संस्कार गंगेच्या पवित्र किनारी असलेल्या आणि परंपरेने ‘मोक्षदायिनी' म्हणून समजल्या जाणा-या या पवित्र परिसरात अधिक प्रगल्भ झालेत. प्रपंच का परमार्थ? लोकांत की एकांत?व्यष्टी का परमेष्टी? golwalkar guruji  या आंतरिक संघर्षाची घालमेल वा तीव्रता त्यांच्या जीवनात याच वास्तव्यात अधिक प्रभावीपणे निर्माण झाली.
 
याच काळात त्यांनी हजारो पुस्तकांचे, ग्रंथांचे मूलग्राही चिंतन केले. golwalkar guruji  त्या सर्व ग्रंथांमध्ये भगवान श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंदांनी मांडलेल्या वेदांतापासून तो अत्याधुनिक विज्ञानाच्या ग्रंथांपर्यंत त्यांच्या वाचनाच्या कक्षा विस्तारल्या होत्या. ज्ञानाग्नि धडाडून पेटला होता. त्यात क्षुद्र आशा-आकांक्षाच्या, विकारांच्या संस्कार राशी जळून भस्म झाल्यात. वाचन-मनन, चिंतन व निदिध्यासन यात ते व्यग्र झाले. golwalkar guruji  यातूनच हळूहळू भावी जीवनाविषयीचे एक ‘दिव्य पाथेय' आकार घेऊ लागले. याची रूपरेषा व प्रत्यंतर त्यांनी त्यांच्या मित्राला लिहिलेल्या काही पत्रांतून व्यक्त केलेल्या विचारांमधून स्पष्ट होतात. एका पत्रात ते म्हणतात- ‘‘जड मानवी जीवनाच्या तारेबरोबर आपलीही तार जुळविण्याची मला मुळीसुद्धा इच्छा नाही. golwalkar guruji  त्याहून अधिक शुद्ध स्वराशी मिलाफ साधण्यासाठी जीवनाची तार आवश्यक तेवढी ताणण्याची माझी इच्छा आहे. ताण तर सोसावाच लागेल. golwalkar guruji  याचा अर्थ हा आहे की, सर्वसाधारण जगापासून अलग व्हावे लागले तरी हरकत नाही.
 
golwalkar guruji  पण जीवनाच्या तारांच्या त्या स्वर्गीय संगीतापेक्षा वेगळा बदसूर निघू नये. या विषयाच्या संदर्भात त्यांचे चिंतन  हे अधिक मूलगामी होऊन निर्णायक स्वरूपावर ते आलेले दिसतात. प्रातिनिधिक स्वरूपाच्या या एकाच पत्रावरून त्यांच्या अंतर्मनाचा कौल हा परमार्थाच्या वस्त-याप्रमाणे तीक्ष्ण असलेल्या (क्षुरस्य धारा:) मार्गावरूनच वाटचाल करण्याकडे झुकला होता, हे निश्चितपणे म्हणता येते. golwalkar guruji  काशी विश्वविद्यालयातच पुढे ते १९३० साली प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांच्या या आंतरिक संघर्षाची तीव्रता कमी झाली. अध्यापन कार्यात ते रमले. वाचन-मनन-ध्यानधारणा यात ते व्यग्र असत. विद्यार्थ्यांमध्ये ते प्रिय झालेत. सर्वजण त्यांना आदराने ‘गुरुजी' संबोधू लागले. golwalkar guruji  काशी विश्वविद्यालयातील हेच नाव पुढे संपूर्ण भारतात विख्यात झाले. याच वास्तव्यात त्यांचा नागपूरहून काशीला शिकण्यासाठी आलेल्या व संघाचे स्वयंसेवक असलेल्या भय्याजी दाणींशी संबंध आला व त्यांच्या मार्फत संघाशीही संबंध आला. golwalkar guruji
 
श्रीगुरुजींचे सारगाछीला प्रस्थान
काशी विश्वविद्यालयातील प्राध्यापकाची नोकरी तीन वर्षांसाठी होती. golwalkar guruji  ती यशस्वीपणे पार पाडून त्याचबरोबर तेथील लक्षावधी ग्रंथ असलेल्या समृद्ध वाचनालयाचा परिपूर्ण फायदा घेऊन, ज्ञान समृद्ध होऊन ते १९३३ मध्ये नागपूरला परतलेत. डॉ. हेडगेवारांंचा आणि त्यांचा पूर्व संबंध, परिचय होताच. golwalkar guruji  संघ कार्याशीही त्यांची चांगलीच ओळख झाली होती. पण मनातील परमार्थाची उर्मी काही केल्या लौकिकात रमू देत नव्हती. त्या दृष्टीने ते गुरूचा शोध घेतच होते. श्रीरामकृष्ण-विवेकानंद भावधारेचे त्यांना मनातून आकर्षण होतेच. golwalkar guruji  नागपूरला रामकृष्ण मठामध्ये, श्री भास्करेश्वरानंदांच्या सहवासात त्यांचा बराच वेळ जात असे. ध्यान-धारणा चालतच असे. त्यातूनच त्यांची आत्मसाक्षात्काराची ओढ प्रबळ झाली आणि तिच्या पूर्ततेसाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू आणि श्रीरामकृष्ण भगवान यांचे अंतरंग शिष्य स्वामी अखंडानंद यांचा सारगाछी आश्रम गाठला. golwalkar guruji  हा आश्रम बंगालमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यात आहे. त्यांच्या सारगाछीला जाण्याच्या निर्णयात स्वामी अमूर्तानंद उपाख्य अमिताभ महाराज यांचा फार मोठा सहभाग आहे. स्वामी अखंडानंदांनी भगवान श्रीरामकृष्ण परमहंसांच्या अनुज्ञेने १३ जानेवारी १९३७ ला, मकरसंक्रमणाच्या शुभ मुहूर्तावर श्रीगुरुजी यांना अनुग्रह दिला. दीक्षा दिली. golwalkar guruji
 
 
श्रीगुरुकृपेने श्रीगुरुजी हे आत्मबोधसंपन्न झाले. त्यांच्या मनाचे मनपण गेले. संकल्प-विकल्प लयाला गेले. ज्ञान स्थिर झाल्याने ते शांतीचे सागर झाले. आपपर भाव नष्ट झाला. एक असीम शांतता, निश्चल, निर्विकार, मनाची अवस्था त्यांना प्राप्त झाली. golwalkar guruji त्यांच्या या अवस्थेचे प्रत्यक्ष दर्शन त्यांच्या गुरुबंधूंना- अमिताभ महाराजांना झाले. दीक्षाग्रहण करून मंदिरात दर्शनाला श्रीगुरुजी गेले तेव्हा ते तेथेच होते. त्यांनी याची आठवण सांगताना म्हंटले की, ‘‘...त्यावेळी श्रीगुरुजी एखाद्या प्रशांत महासागरासारखे शांत आणि गंभीर दिसत होते.'' तर दीक्षा प्राप्त झाल्यानंतरच्या अनुभूतीचे वर्णन करताना स्वतः श्रीगुरुजींनीच म्हटले आहे की,... ‘‘मला जाणवले की, मी संपूर्णपणे बदलून गेलो आहे. golwalkar guruji एका मिनिटापूर्वी मी जो होतो तो आता राहिलेलो नाही.'' या प्रमाणे आंतरबाह्य संपूर्णपणे बदललेले श्रीगुरुजी १९३७ च्या मार्च महिन्यात पुन्हा नागपूरला परतलेत. golwalkar guruji  तेथे त्यांची एक महान व्यक्ती आतुरतेने, व्याकुळतेने, आर्ततेने, जीवाच्या कासाविसिने वाट पाहत होती. त्या महान व्यक्तीचे नाव होते संघ संस्थापक पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवाऱ!
 
 
संघ-कार्याचा जीवन कार्य म्हणून स्वीकार
श्रीगुरुजी आणि डॉ. हेडगेवार यांचा संबंध तसा १९३१ पासून होताच. golwalkar guruji  श्रीगुरुजी बनारसला प्राध्यापक म्हणून असताना त्यांचा प्रत्यक्ष संघकार्याशीही संबंध आलाच होता. त्यामुळे संघ, संघाचा विचार, शाखेच्या माध्यमातून संस्कारयुक्त ‘माणूस' घडविण्याची कार्यपद्धती याच्याशी ते चांगले परिचित होते. या सर्व पद्धतीत आणि मातृभूमीच्या भक्तीने रसरसलेल्या अंत:करणांची आणि आपल्या दरिद्री, पीडित, अज्ञानी देशबंधूंची ‘शिवभावाने जीवसेवा' करणा-या, सिंह कुळाचा वारसा जपणारी, दुर्दम्य इच्छाशक्तीने सागराचा तळही शोधणारी '‘माणसे'' उभी राहिल्याशिवाय या भारतमातेचे भविष्य आणि स्वरूप बदलणार नाही, या स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीत त्यांना विलक्षण साम्य आढळून आले. golwalkar guruji  त्यांना सत्तेच्या राजकारणात रस नव्हता तर डॉ. हेडगेवार म्हणतात त्याप्रमाणे ‘हिंदुत्वाच्या सांस्कृतिक अधिष्ठानावरच राष्ट्रभक्तीने ओतप्रोत झालेल्या हृदयांची संघटित शक्ती मातृभूमीला पुनर्वैभव प्राप्त करून देऊ शकेल'' या विधायक व भावात्मक विचारधारेला त्यांनी मान्य केले आणि ते डॉ. हेडगेवारांच्या आग्रहाने संघकार्यात कार्यरत झालेत. golwalkar guruji  डॉ. हेडगेवारांच्या समवेत संघकार्यासाठी देशात प्रवास करू लागलेत.
 
त्यांत डॉक्टरांच्या राष्ट्रसमर्पित, निःस्वार्थी, अकुतोभय, करुणेने व्याप्त अशा व्यक्तिमत्त्वाशी त्यांचा जवळून संबंध आला आणि त्यांच्याच आग्रहाने त्यांनी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह म्हणून आणि सन १९४० मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्याच इच्छेप्रमाणे व आग्रहाने संघाचे द्वितीय सरसंघचालक म्हणून दायित्व स्वीकारले आणि सांस्कृतिक अधिष्ठानावर आसेतू-हिमाचल पसरलेल्या या हिंदू समाजाची संघटित शक्ती उभी करण्याचा, १९४० ते १९७३ या प्रदीर्घ कालखंडात अथक प्रयत्न केला. golwalkar guruji  जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत एकच ध्यास मातृभूमीची असीम भक्ती-समाजरूपी विराट पुरुषाची अजिंक्य शक्ती. असा हा संस्कृती रक्षणासाठी भक्ती आणि शक्तीचा संगम-समन्वय म्हणजे प.पू. श्रीगुरुजींचे जीवन. भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगाला श्रेष्ठत्वाकडे नेण्यासाठी ‘आर्यत्वा'कडे नेण्यासाठीच ईश्वराने जन्माला घातली आहे. तिचे तेच ‘नियत' कर्तव्य (मिशन) आहे. golwalkar guruji  त्याच भूमिकेतून श्रीअरविंदांनी या भूमीला ‘गॉड चोझन- लँड' असे म्हटले तर या भूमीत उत्पन्न झालेल्या ‘विश्वात्मक विचाराला' अद्वैत सिद्धांतावर आधारित वेदान्त विचाराला स्वामी विवेकानंदांनी ‘डिव्हाईन मेसेज फॉर होल ह्युमॅनिटी' म्हणून संबोधिले आहे.
 
 
या संत श्रेष्ठ महापुरुषांच्या मालिकेत चपखल आणि पूर्णपणे शोभणारे असे प.पू. श्रीगुरुजींचे चरित्र आहे. ते संत होते. पण ‘संतत्वाचा' बाजार त्यांनी कधी मांडला नाही. ते ‘योगी' होते, पण हिमालयाच्या गुफांमध्ये एकांतात ते कधी गेले नाहीत. ते ‘भक्त' होते, पण ‘टाळ-चिपळ्या' घेऊन त्यांनी कधी संकीर्तन केले नाही. ते ‘ज्ञानी' होते, पण त्याचा अहंकार, प्रदर्शन त्यांनी कधी केले नाही. ते ‘साधक' होते, पण कसलेही ‘कर्मकाण्ड' त्यांनी केले नाही. ते ‘कर्मयोगी' होते, पण त्या कर्माचीही स्मृती त्यांनी कधी ठेवली नाही. कर्म केल्याचे जाणवूही दिले नाही. असे हे दैवी गुण संपदेने परिपूर्ण असलेले व्यक्तिमत्त्व! आत्मज्ञानी असणारा महंत हा श्रीसमर्थ रामदासस्वामींचा आदर्श पुरुष आहे. श्रीसमर्थांच्या महंताप्रमाणे आणि संतांप्रमाणेच प. पू. श्रीगुरुजींचे संपूर्ण जीवन व्यतीत झाले आहे. राष्ट्रकार्यात समिधा म्हणून आपल्या जीवनाची आहुती देणा-या या महापुरुषाच्या चरणी ही श्रद्धांजली समर्पित!!
९८६०२९६१३१