10086 शालेय विद्यार्थ्यांची होणार आरोग्य तपासणी

17 Feb 2023 19:59:12
तभा वृत्तसेवा 
अर्जुनी मोर, 
Health examination : जागरूक पालक, सुदृढ बालक हा राज्य शासनाचा अभिनव उपक्रम संपूर्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत राबिण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील 10086 शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणार आहे. यासाठी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे गटनेते व जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांनी दिली आहे.
Health examination
 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या मोहिमेचा शुभारंभ संपूर्ण राज्यात ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ मोहिमे राबविण्यात येत आहे. यातंर्गत योजनेचा तालुकास्तरीय शुभारंभ बाक्टी येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळेत करण्यात आला. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी पंस सदस्य पुष्पलता दृ्रगकर, पंस सदस्य कुंदा लोगडे, अमरचंद ठवरे, डॉ. विजय राऊत, डॉ. कुंदन कुलसुंगे, गुलशन सांगोळे, मुख्याध्यापक एस. एच. चांदेवार, एन. बी. लंजे, डॉ. पूजा गजभिये, डॉ. पल्लवी नाकाडे उपस्थित होते. डॉ. कुलसुंगे यांनी प्रास्ताविकेतून मोहिमेची माहिती दिली.
 
 
डॉ. राऊत यांनी, मोहिम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील जिप शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांना स्वंयपूर्तीने सहकार्य करण्याचे आवाहन केले. दरम्यान, बाक्टी जिप शाळेतील 125 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी (Health examination) करून औषधोपचार करण्यात आले. संचालन झामेस गायकवाड यांनी केले. आभार नलिनी मुरकुटे यांनी केले. आयोजनासाठी पूजा झरारिया, आरती काळे, चेतना मोहरले, स्नेहल बनसोड, रवी दोनोळे, रामकृष्ण शहारे, अनंता सातारे, संदीप बनकर, प्रतीक्षा कुरूटकर, रवीना कोडापे, माधुरी राजगिरे, रंजना राखडे, रेखा कोसरे, माहेश्वरी सूर्यवंशी, प्रतीक शहारे, देशमुख यांनी परिश्रम घेतले.
 
Powered By Sangraha 9.0