रामेश्वरी ते तेलंगखेडी मंदिरापर्यंत महाकाल पालखी पदयात्रा मंगळवारी

17 Feb 2023 17:38:55
नागपूर,
राठोड बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने Mahakal Palkhi महाकाल पालखी यात्रा महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, महाकाल पालखी पदयात्रेला मंगळवारी, 21 फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता मौर्य समाज सभागृह, साकेतनगर, दाढीवाल ले आऊट येथून सुरुवात होईल.
 
  
rf
 
ही पदयात्रा साकेत नगर, Mahakal Palkhi रामेश्वरी चौक, नरेंद्र नगर, छत्रपती चौक, देवनगर, तात्या टोपे नगर, लक्ष्मी नगर, बजाज नगर, शंकर नगर, धरमपेठ, रामनगर, रवी नगर अशी मार्गक्रमण करून तेलंगखेडी मंदिर येथे समाप्त होईल. आयोजक गजेंद्रसिंह राठोड उर्फ गोलू भाई आणि नितीन मिश्रा यांनी पालखी पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त संख्येने भाविक भक्तांनी तसेच वस्तीतील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
 
 
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0