नवी दिल्ली,
राज्यातील लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पखवाज, कथक नृत्य कलाकारांना आणि संगीत वाद्य निर्मात्यांना sangeet natak akademi प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. sangeet natak akademi राज्यातील एकूण ११ कलाकारांचा पुरस्कार प्राप्तांमध्ये समावेश आहे. sangeet natak akademi दिल्लीतील मेघदूत सभागृहात आयोजित अमृत युवा कलोत्सवात ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ Ustad Bismillah Khan प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, उपाध्यक्ष जोरावरसिंग जाधव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. sangeet natak akademi या कार्यक्रमात वर्ष २०१९, २०२० आणि २०२१ चे तीन वर्षांसाठीचे एकूण १०२ युवा कलाकारांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
वर्ष २०१९ साठी लोकसंगीत श्रेणीतील योगदानासाठी राज्यातील विकास कोकाटे, वर्ष २०२० साठी तबला वाद्य बनविणारे किशोर व्हटकर, संगीत वाद्य बनविण्याची श्रेणी नव्याने सुरू करण्यात आली असून श्री व्हटकर या श्रेणीतील पुरस्कार स्वीकारणारे प्रथम कलाकार आहेत. sangeet natak akademi वर्ष २०२० साठी सारंगी वादनासाठी हर्ष नारायण, हिदुस्थानी वाद्य संगीत सितार वादनासाठी शाकीर खान, कर्नाटक वाद्य संगीत (वायलिन) वादनात उल्लेखनिय कार्यासाठी एल. राम कृष्णन, ओडिसा नृत्यातील त्यांच्या योगदानासाठी स्वप्नकल्पा दास गुप्ता, भरतनाट्यम नृत्यातील योगदानासाठी पवित्र कृष्ण भट्ट यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हे पण वाचा ... मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर !

sangeet natak akademi वर्ष २०२१ साठी तमाशा या श्रेणीत सुप्रसिद्ध तमाशा कलाकार वैशाली जाधव, पखवाज वादनाच्या योगदानासाठी पंढरपूरातील ज्ञानेश्वर देशमुख, नृत्यासाठी संगीत श्रेणीतील त्यांच्या योगदानासाठी मुंबईत जन्मलेले अहसान अली, कथक नृत्यातील समग्र योगदासाठी सुनील सुनकारा यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. संग्राम भंडारे यांना वारकारी कीर्तन या श्रेणीतील युवा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र ते पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होऊ शकले नाहीत. sangeet natak akademi मूळच्या महाराष्ट्रातील वर्धेच्या गौरी देवल यांना अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पण वाचा ... गगनम् गगनाकारम् ... श्री गुरुजी !
गौरी या सध्या दिल्लीत स्थायिक असून नाट्य क्षेत्रातील एक सुपरिचित व्यक्तीमत्व आहेत. sangeet natak akademi संगीत, नृत्य, नाटक, पांरपरिक(लोकसंगीत/आदिवासी/ नृत्य/संगीत/नाटक/ बोलक्या बाहुल्या) या श्रेणीतील युवा कलाकारांना कलेच्या योगदानासाठी ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा’ पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाते. sangeet natak akademi यासह परफॉर्मिंग आर्ट्स सादर करणाऱ्यांना पुरस्कारांतर्गत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. पुरस्काराची वयोमर्यादा ४० वर्षापर्यंत असून पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे.