लखीमपूर खिरी,
कोणतेही दस्तावेज नसताना (India-Nepal border) नेपाळ सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चिनी नागरिकाला सीमा सशस्त्र दलाने अटक केली. या चिनी नागरिकाला गौरिफंटा परिसरातून शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली, असे पोलिस उपअधीक्षक आदित्यकुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. कोठडीत केलेल्या चौकशीदरम्यान भारतात वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध दस्तावेज तो सादर करू शकला नाही. संपूर्ण तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे आदित्यकुमार यांनी सांगितले.