‘त्या’ निर्णयाचे शिवसेना कार्यालयासमोर फटाके फोडून स्वागत

- शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदेकडे

    दिनांक :18-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
मागील आठ महिन्यापासून मूळ शिवसेना (Shiv Sena) कोणाची, असा वाद निवडणूक आयोगाकडे निर्णयाधीन होता. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मूळ शिवसेना व धनुष्यबाण नेमका कोणाचा, असा संभ्रम निर्माण झाला होता. शेवटी 17 रोजी मुख्य निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय जाहीर केल्याने विषयावर पुर्णविराम झाला.
Shiv Sena
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्रतिनिधी सदस्य असलेले 40 आमदार, 13 खासदार यांचे समर्थन असल्याने मूळ शिवसेना ही आमचीच असल्याबाबतची याचिका मुख्य निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. सन 2018 साली शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत पारित करण्यात आलेल्या ठरावात असे ठरले होते की, राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड प्रतिनिधी सभा करेल, असा ठराव शिवसेनेने (Shiv Sena) घेतला होता. या आधारावर एकनाथ शिंदे यांना समर्थन असलेले 40 आमदार व 13 खासदार यांच्या मतदानाच्या 76 टक्के टक्केवारी प्राप्त होत असल्याने मूळ शिवसेना व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या मागणीला मान्यता देत असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे जिल्हा शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून स्वागत करण्यात आले.
 
 
जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेश सराफ यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख गणेश इखार यांच्या नेतृत्त्वात 18 रोजी जिल्हा संपर्क कार्यालयात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. यावेळी युवासेना (Shiv Sena) जिल्हाप्रमुख निखिल सातपुते, जिल्हा संघटक संदीप इंगळे, उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे, तालुका प्रमुख विवेक ठाकरे, शहर प्रमुख विजय हाडगे, पवन धोंगडे, आदित्य गारसे, सचिन घोडमारे, तेजराम लिचडे, रुपेश कोठाले, विठ्ठल गराड आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.