नवी दिल्ली,
rbi gold सोने खरेदीत केलेली गुंतवणूक नेहमीच चांगले रिटर्न्स देणारी असते. आर्थिक तंगीच्या काळात सोन्याचा आधार असतो, ही भारतीय समाजाची मानसिकता आहे. rbi gold भारतीय रिझर्व्ह बँकेचा कारभारही सोन्याच्या साठ्यावर ब-याच प्रमाणात अवलंबून असतो. rbi gold सणासुदीला, कौटुंबिक कार्यक्रमात किंवा लग्नसराईत आपल्याकडे सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेने सोनेखरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. rbi gold
rbi gold सध्या भारतातील सोन्याचा एकूण साठा बघता, जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असणा-या अव्वल १० देशांमध्ये आपल्या देशाचा क्रमांक नववा झाला आहे. या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, हे विशेष! rbi gold एका आकडेवारीनुसार, अमेरिकेकडे ८,१३३ टन सोनं आहे, तर दुस-या क्रमांकावर असलेल्या जर्मनीकडे ३,३५९ टन सोनं आहे. rbi gold चीन १,९४८ टन सोन्यासह ६ व्या स्थानावर आहे. सोन्याचा मोठा साठा असलेल्या टॉप-१० देशांमध्ये फक्त तीन आशियाई देशांचा समावेश आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या दोन वर्षांत जवळपास १०० टन सोन्याची खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. rbi gold २०२२ मध्ये आरबीआयने जारी केलेल्या माहितीनुसार, देशात ७५४ टन सोन्याचा साठा आहे. यातील बहुतांश खरेदी गेल्या ५ वर्षांत झाली आहे. एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२२ दरम्यान रिझर्व्ह बँकेने १३२.३४ टन सोन्याची खरेदी केली. rbi gold तर वर्ष २०२० मध्ये केवळ ४१.६८ टन सोन्याची खरेदी झाली होती.
अब्जावधी रुपये मुल्याचा हा सोनसाठा आरबीआयने कुठे ठेवलाय? rbi gold असा प्रश्न सामान्यांना पडणे साहजिक आहे.भारताच्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी २९६.४८ टन सोनं देशातच सुरक्षित आहे, तर ४४७.३० टन सोनं परदेशी बँकांकडे सुरक्षित आहे. rbi gold यातील बहुतांश सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे ठेवलेलं असून काही टन स्वित्झर्लंडमधील बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटकडे सुरक्षित आहे.
rbi gold आरबीआय परदेशात सोने का ठेवते? तर यामागे दोन मोठी कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करुन ते देशात आणणे सोपे नाही. त्याची वाहतूक आणि सुरक्षेवर मोठा खर्च होतो. rbi gold याशिवाय कोणत्याही आर्थिक संकटात हे सोनं गहाण ठेवण्याची गरज भासल्यास ते पुन्हा परदेशात पाठवताना मोठा खर्च आणि सुरक्षेची कसरत करावी लागेल. वर्ष १९९०-९१ मध्ये भारताला बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस दरम्यान बँक ऑफ इंग्लंड आणि युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे ६७ टन सोने गहाण ठेवावे लागले होते. rbi gold सद्यस्थिती बघता, अशी वेळ पुन्हा येणार नाही, याचा भारतीयांना विश्वास आहे, हे निश्चित!