नागपूर,
नागपूर शहरातील दिव्यांग बंधु-भगिनींच्या वतीने बास्केटबॉल ग्राउंड, चंदन नगर येथे (Bachu Kadu) माजी राज्यमंत्री व आमदार बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गिरीश पांडव, प्रा संजय नाथे, योगेश तिवारी, प्रवीण शर्मा, अभिजित राऊत, सागर मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सागर मेश्राम या दिव्यांगाचा सत्कार करण्यात आला.
आपले मत व्यक्त करतांना बच्चू कडू (Bachu Kadu) म्हणाले की, दिव्यांगांचे अनेक प्रश्न आहेत, रोजगार, शिक्षण, आरोग्य इत्यादी... त्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलने केली, शासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळेच आता त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा झाली, शिवाय त्यांच्यासाठी एक हजार कोटींचे बजेटसुद्धा मंजूर केले. कार्यक्रमाचे संचालन दिव्यांग जनक्रांती संघटनेचे अध्यक्ष बाळू मांडवकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बंधु-भगिनी तसेच वसाहतीतील नागरिक उपस्थित होते.
- सौजन्य : मीना पाटील, संपर्क मित्र