नागपूर,
हिंदुस्थानाच्या इतिहासात राजे आणि राजसतांची Chhatrapati Shivaji वानवा नव्हती. शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा स्वतःला राजे म्हणवणारे आणि समजणारे परंतु प्रत्यक्षात इस्लामी सत्तेची चाकरी करणारे अनेक होते. निर्भयपणे, ताढपणे जगता न येणाऱ्या अशा शाखांची संख्या बरीच होती. या प्रतिकुल परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर शिवाजी महाराजांनी इतिहासाला कलाटणी देऊन एका नव्या वळणावर आणून उभे केले त्यांची ही कामगिरी कधीही न पुसता येणारी आहे.
शिवाजीचे Chhatrapati Shivaji खाजगी जिवन म्हणजे उच्च चारित्र्याचा एक आदर्श होता आपल्या खाजगी जिवनात एक कर्तव्यदक्ष मुलगा, वत्सल पिता आणि प्रेमळ पिता या नात्यानेच वागत असे. जन्मापासुनच शिवाजीची धर्माकडे स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने आणि त्यातच लहानपणी त्याच्यावर वेळोवेळी प्रखर धार्मिक संस्कार असल्याने शिवाजींचा मन:पिंड सर्वार्थाने धार्मिक बनलेला होता. घ्यामुळेच शिवाजी आपल्या पुढील जीवनात मी भोगी, वैराग्यशील, पापापासून मुक्त आणि साघुसताचा सत्कार करणारा असा घडविला गेला. त्याला सर्व धर्मातील साधुसंताबद्दल सारखेच प्रेम वाटत असे आणि सर्व धर्मियांना ते सारखेच सहिष्णू वृत्तीने वागवत असे, यावरून त्यांचा धर्मविषयक दृष्टिकोण किती उदार होता, हे दिसून येते.
उत्तर हिंदुस्थानात अत्यंत सशक्त मोघल सत्ता होती, संपूर्ण देश जेव्हा इस्लामी साबांच्या प्रभावाखाली होता, तेव्हा क्याच्या पंधराव्या वर्षी शिवाजी राजांनी हिंदी स्वराज्याची मुहूर्तमठ रोवली, शिवाजीराजांची राजमुद्रा त्यांच्या स्वातंत्र्याचा, दृद्धिंगत होणाऱ्या सार्वभौम सलेचा प्रकट, जाहीरनामा होता. शिवरायांच्या अथक प्रयत्नांमधून निर्माण झाले हे महाराष्ट्र राज्य फार मोठे नव्हते हे खरे आहे. परंतु ज्या मूल्यांवर अधिष्टित हे राज्य होते मध्ययुगीन इतिहासाला श्री शिवछत्रपतीनी कलाटणी दिली होती. राज्याची निर्मिती विशिष्ट ध्येयांनी, धोरणांनी प्रेरित होऊन केली जाणे, ही मध्ययुगीन काळातील दुर्मक गोष्ट आहे, शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या सलेला भरभक्कम नैतिक पाया होता. विशिष्ट ध्येय, धोरण आणि नैतिक अधिष्ठान यांमुळे शून्यातून स्वराज्याची निर्मिती होवू शकली. शिवाजी धर्माभिमानी, श्रद्धावान, सत्संगाच भुकेला, गुठवाद मानवारा, अलौकिक घटनांवर विश्वास ठेवणारा, ईश्वरसाक्षात्कार अनुभव राच्ोणारा पुरुष होता, असे ऐतिहासीक पुराव्यांवरून ठरते शिवाजी श्रद्धाळू होते हे निर्विवाद पण ते शहाणे व विवेकी होते हे त्याहून सत्य आहे. मराठ्यांच्या विभक्तवृत्तीला आळा घालणे, हा शिवाजीच्या अंगी मोठा गुण होता.
नेतृत्ववादी छत्रपती शिवाजी-
शिवाजी महाराजांच्या Chhatrapati Shivaji नेतृत्वाखाली त्यांच कोदय प्रशासन चालत असे, त्यांच्या मदतीला त्यांनी अष्टप्रधान नेमले होते. या मंडळाचा सल्ला राजांवर बंधनकारक नसे. वा मंत्री अधिकारी नेमताना गुणवत्तेला महत्व दिले जात असे, अष्टप्रधानांकडे 'अठरा कारखाने आणि 'बारा महाल सोपवले होते. त्यावरून राज्यकारभाराची सुक्ष्म विभागणी जाणवते. राज्यव्यवहार व हुद्दे याबाबत महाराजांनी मराठी भाषेला महत्व दिले. रघुनाथ पंडिताकडून - राज्यव्यवहारकोश- करवून घेतला, शिवाजी महाराजांनी महसुल- व्यवस्थेत सुधारणा घडवून आणल्या. रयतेचा वाटा रयतेस पावे आणि राजभाग आपणास येई हो करणे, असे त्यांचं सूत्र होत. वतनदारांवर त्यांनी नियंत्रण प्रस्थापित केलं. 'भाजीच्या देठालासुद्धा हात लावू नका? अशा सकत आज्ञा अधिकान्यांना दिल्या.स्वराज्यातील शेतकरी व निराधारांचा आधार म्हणजे शिवराय शोषितांचा आधार म्हणजे शिवराय, लोककल्याण म्हणजे शिवराय, शून्य म्हणजे शिवराय आणि अनंत म्हणजे ही शिवराय!
लोककल्याणकारी राजा-
शिवछत्रपतींनी Chhatrapati Shivaji कधीही ब्राम्हण, मुस्लिम, शुद्ध असा भेद केला नाही, ते म्हणायचे आमचे राज्य न्यायान्या असेल, नीतीचे असेल, लोककल्याणार्थ असेल, वैदिक न्यायतत्व जर रयतेचे शोषण करणार असेल, तर ते जुगारून देऊन आम्ही आमचे लोकधर्माचे न्यायतत्व स्वीकास जे शिवधर्म म्हणून प्रचलित होईल ज्या न्यायतत्वात ब्राम्हण उपाणिशुद्धीक एकाच मापाने मोजले जाईल, शिवछत्रपती हे विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, वासाववटी, विवेकशील प्रयत्नवादी होते. महाराजांची मातृभक्ती, पिभक्ती जितकी महत्वाची तितकीच बोलणीय त्यांची गुरुभक्ती होती. माणसे जुळवणे हा त्यांचा मोठा गुण होता गरीब श्रीमंत, उच्च नीच हा भेद त्यांच्यात नव्हता त्यांनी रयतेवर व आपल्या मावळ्यांवर असे प्रेम केले की या प्रेमासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे असंख्य मित्र त्यांना मिळाले.