पृथ्वी हादरली, अरुणाचल प्रदेशात भूकंप

    दिनांक :19-Feb-2023
Total Views |
गुवाहाटी,
अरुणाचल प्रदेशच्या (Earthquake) पश्चिम भागात आज रविवारी दुपारी भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12.12 वाजता भूकंपाचे धक्के बसले. भूटान सीमेजवळील पश्चिम कामेंग येथे भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर होता. मध्य-उत्तर आसाम आणि भूतानच्या पूर्व भागापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. जखमी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. वास्तविक, उत्तर-पूर्व प्रदेश हा भूकंपाच्या उच्च क्षेत्रात येतो. येथे अनेकदा भूकंप होतात.

Earthquake
 
मध्य प्रदेशातही भूकंप
दुसरीकडे, रविवारी दुपारी 12.54 वाजता मध्य प्रदेशात (Earthquake) भूकंपाचे सौम्य धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता तीन इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू इंदूरपासून 151 किमी अंतरावर होता. भूकंप 10 किमी खोलीवर झाला.
 
शुक्रवारी आणि गुरुवारीही भूकंपाचे धक्के
शुक्रवारी आणि गुरुवारीही जम्मू-काश्मीर आणि मेघालयमध्ये (Earthquake) भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे शुक्रवारी 3,6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सकाळी 5:01 वाजता झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कटरापासून 97 किमी पूर्वेला 10 किमी खोलीवर होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.