तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
Shiv Jayanti : प्रजेसोबत वृक्षाचेही हित जोपासणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिकवण छोट्या बालकांच्या मनातही रुजावी यासाठी वृक्षमित्र परिवाराने दि.१९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या पवित्र दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी राजे यांच्या जयंतीदिन वृक्षारोपण करून साजरा केला.
विशेष म्हणजे (Shiv Jayanti) यावेळी उपस्थित छोट्या बालकांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांना महाराजांचे पर्यावरणाच्या बाबतीतील विचार अवगत करण्यात आले. महाराजांनी 19 मे 1773 ला आपल्या मामलेदाराना लिहिलेल्या पत्रातून वृक्षा संबंधी मार्गदर्शन केले होते. त्या पत्रात महाराज लिहितात की, झाडी ही प्रयत्नपूर्वक वाढवावी.अगदी काठी करण्यासाठीही झाडे तोडू नये. वेगवेगळ्या वेलींची लागवड करावी सर्व प्रजातींच्या झाडांची, फुलांची, वेलींची लागवड थांबवू देऊ नका. झाडांचा उपयोग रक्षणासाठी,औषधपाणी,फळे, भाजीपाला व झाडांपासून पर्यावरणाचे रक्षण होते हे राजांचे त्या काळातील विचार आजही किती प्रासंगिक आहे हे यावेळी उपस्थितांच्या मनावर बिंबविण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात वृक्षमित्र परिवारा तर्फे महाराजांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti) भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री हर्षल गायकवाड, सौ गायकवाड डाॅ.आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव श्री अनिल जवादे, नायब तहसीलदार श्री भोसले,सौ भोसले, श्री घोरपडे, प्रशासकीय अधिकारी शिंदे,उद्यान अधिकारी प्रवीण काळे व ऊद्यान चमू यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व अभिवादन करून वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे हस्ते भारतीय विविध प्रजातीचे अशोक,कदंब,बीहाडा,काटसावर मोह ई.वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
बालकांमध्ये वृक्ष संस्कार वृध्दिंगत व्हावे म्हणून वृक्षमित्र परिवारातील लहान मूले सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी बालकांच्या हस्ते वृक्षारोपण करून छ.शिवाजी महाराजांचे वृक्षप्रेमा विषयीची माहिती देण्यात आली.याप्रसंगी राघव चितलांगे, तनिष टेंभूर्णे, अनय भांडे,श्रीमय भांडे, कु. कृतीका चांभारे, कुं. गुंजन पोकळे, कु. लावण्या डेकाटे, कु.नेतल त्रिवेदी, कु.नीर त्रिवेदी, कु. चतुर्थी वैद्य, कु. अवनी क्षिरसागर, कु. निर्मई क्षिरसागर, हे बालवृक्षमित्र उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वृक्षमित्र उपस्थित होते.शेवटी छ.शिवाजी महाराजांचा जयघोष करून अभिवादन करण्यात आले.