डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली नवदृष्टी

- संजय राठोड यांच्या संकल्पना
- 577 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

    दिनांक :20-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ, 
Dr. Tatya Rao Lahane : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग‘स, दारव्हा, नेर या तालुक्यांत झालेल्या ‘आरोग्य संकल्प शिबिरा’तून निवडलेल्या रुग्णांची नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रकि‘या येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पार पडली. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या सहकारी डॉ. रागिणी पारेख यांनी दोन दिवसांत तब्बल 577 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रकि‘या केली.
 
Dr. Tatya Rao Lahane
 
वैद्यकीय महाविद्यालय सुपर स्पेशालिटीमध्ये झालेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिरात तब्बल 1,550 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात मोतीबिंदू शस्त्रकि‘येसाठी पात्र ठरलेल्या 577 रुग्णांवर पद्मश्री डॉ. लहाने, डॉ. पारेख व त्यांच्या सहकार्‍यांनी शस्त्रकि‘या केल्या. पालकमंत्री संजय राठोड यांनी नेत्र शस्त्रकि‘या झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषद मु‘य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचळ यांनीही शिबिराला भेट दिली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले.