जिल्ह्यात विविध ठिकाणी छत्रपतींना अभिवादन ..!

    दिनांक :20-Feb-2023
Total Views |
यवतमाळ, 
जिल्ह्यात अनेक भागांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आर्णी येथील विद्यार्थिनी विशाखा गणेश कदम यांनी रांगोळीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे अतिशय आकर्षक चित्र रेखाटले आहे.
Shiv Jayanti
 
राळेगाव : राळेगाव तालुक्यातील बोरी इचोड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवजयंती (Shiv Jayanti) उत्सव समिती बोरी इचोड तसेच समस्त ग‘ामवासीयांतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत गावातील महिलांनी लेझीम तसेच युवकांनी बँड पथक यासह लहान युवकांनी शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत विशेष सहभाग घेतला होता. संपूर्ण गाव जय भवानी जय शिवाजीच्या गजराने दुमदुमले होते. जयंती साजरी करण्याकरिता गावातील शिवजयंती उत्सव समितीने परिश्रम घेतले.
Shiv Jayanti 
 
पुसद येथे मान्यवरांचे छत्रपतींना अभिवादन ..!
शिवजयंती (Shiv Jayanti) उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात छत्रपतींना मान्यवरांनी अभिवादन केले. सकाळी 8.30 वाजता प्रारंभी शिव जन्म उत्सव समितीचे अध्यक्ष तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शिवपूजन कार्यक‘माला माजी आमदार विजय पाटील, आमदार अ‍ॅड. इंद्रनील नाईक, माधव माने, अ‍ॅड. आशिष देशमुख, माजी बांधकाम सभापती राम देवसरकर, भिमराव कांबळे, ताहेरखान पठाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, शेख कयुम, रीयासत अली, नितीन पवार, अजय पुरोहित, प्रकाश पानपत्ते, शुभांगी पानपत्तेे, प‘वी देशमुख, यशवंत चौधरी, दीपक जाधव, अ‍ॅड. भारत जाधवसह सहकार, राजकारण, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील तसेच पत्रकारांनी छत्रपतींना अभिवादन केले. याप्रसंगी अ‍ॅड. आप्पराव मैंद लिखीत शिव महिमा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक‘माचे संचालन चंद्रकांत ठेंगे यांनी केले.
 
 
उमरखेड शहरात शिवजयंती उत्सवात साजरी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती (Shiv Jayanti) निमित्त शहरात विविध कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मिरवणूकीला सुरवात करण्यात आली. मु‘य रस्त्याने लेझीम पथकासह शोभायात्रा काढण्यात आली. झाकी तसेच छत्रपती शिवराय यांच्या वेशभुषा परीधान करणार्‍या विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतीच्या तैलचित्रास अभिवादन करून सुवर्णपथ मार्गाने महाराजांचा जयघोष करीत माहेश्वरी खुले नाट्यगृह येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी मिरवणूकीत सहभाग घेऊन शांततेत मिरवणूक पार पाडली. यावेळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
 
 
गारगव्हाण येथे शिवाजी महाराज जयंती
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti) गारगव्हाण येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे हदगाव तालुकाध्यक्ष तातेराव वाकोडे, भाजपा सरचिटणीस पवन वानखेडे यांची उपस्थिती होती. कार्यक‘माच्या ठिकाणी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भगवाध्वज स्थापना करण्यात आला. जयंतीनिमित्त गारगाव येथे कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी भाजपाचे तालुकाध्यक्ष तातेराव पाटील वाकोडे व इतर उपस्थितानी आपले विचार व्यक्त केले. यावेळी सुरेश वाढवे, सरपंच रणजीत वाढवे, पोलिस पाटील कैलास तांबारे, संतोष सुरोशे, प्रेमराव मस्के, हनुमंत भंडारे, आनंद मोहिते, उत्तम जोडतळे, तुकाराम तांबारे व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 
 
न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात
जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Shiv Jayanti) उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक‘माचे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित बदनोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरीष हांडे, न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय यवतमाळ सुभाष काफरे, जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित लाऊळकर, न्यायाधीश औद्योगिक न्यायालय अरविंद भांडारवार, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अनिल कुळकर्णी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कुणाल नाहर, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आकाश थोरात, महेश डवले, बाळासाहेब संकपाल मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक अ‍ॅड. धनंजय मानकर यांनी केले. कार्यक‘मात न्या. हांडे, अ‍ॅड. गाडबैले, अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, अ‍ॅड. इम‘ान देशमुख, अ‍ॅड. वीरेंद्र दरणे यांच्यासह अध्यक्षीय भाषण बारचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित बदनोरे यांनी केले. कार्यक‘माचे संचालन अ‍ॅड. प्रशांत किर्दक व आभारप्रदर्शन अ‍ॅड. आशिष तोटे यांनी केले. कार्यक‘मास यवतमाळ जिल्हा बारचे अ‍ॅड. कापरेकर, अ‍ॅड. विपिन ठाकरे, अ‍ॅड. राजू साबळे, अ‍ॅड. नथवानी, अ‍ॅड. राजेश चव्हाण, अ‍ॅड. अमोल बोरखडे, अ‍ॅड. चमेडिया, अ‍ॅड. जयंत ठाकरे यांच्यासह सर्व वकील सदस्य व कर्मचारी संघटनेचे कर्मचारी मोठ्या सं‘येने उपस्थित होते.
 
 
‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीताने दुमदुमला परिसर
रविवार, 19 फेब‘ुवारी पासून जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली. त्या गीताचे दारव्हा तालुक्यात अँग्लो व्हर्नाक्युलर एज्युकेशन सोसायटी दारव्हा या शैक्षणिक संस्थेत सर्वप्रथम ‘जयजय महाराष्ट्र माझा’ या गीताने प्रारंभ झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव (Shiv Jayanti) साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणाला संस्थेतील घेरवरा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे मु‘याध्यापक सुरेश निमकर आणि उमाबाई शंकरराव कणीकर माध्यमिक कन्या शाळेच्या मु‘याध्यापक कल्पना धवने, इतर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
 
 
रुई येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
ग‘ामपंचायत रुई (धा) येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच अमोल कदम यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच भिमराव वाढवे, ग‘ामपंचायत सदस्य, देविदास कदम, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे, अध्यक्ष, सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठीत नागरिक व पदाधिकारी, ग‘ामपंचायत कर्मचारी, बालाजी डोके, कैलास कदम, देवानंद कदम, गजानन वानखेडे व नागरिक उपस्थित होते.