कानोसा
- अमोल पुसदकर
विजया एकादशी हा पूजनीय श्रीगुरुजी उपाख्य माधव सदाशिवराव गोळवलकर (Madhav Sadashivarao Golwalkar) यांचा जन्मदिवस होय. इंग्रजी कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी 1906 ही त्यांची जन्मतारीख होती. 1940 ते 1973 या 33 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी 33 वेळा भारताची परिक्रमा केली. भारताचे चित्र त्यांच्या मनामध्ये ताजे होते. भारतमाता ही त्यांची खरोखरच माता होती. संघाच्या स्वयंसेवकांनी समाज जीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात जावे व तेथे आपल्या संस्कारानुरूप कार्य उभे करावे यासाठी विश्व हिंदू परिषदेसारख्या अनेकानेक संस्था त्यांच्या प्रेरणेने सुरू झाल्या. साहित्य, विज्ञान, समाजजीवन अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. 1962 साली चीनने भारतावर आक‘मण केले. त्यापूर्वी चीन अशी काही आगळीक करू शकतो अशा पद्धतीचे वातावरण देशांमध्ये होते. श्रीगुरुजींनी अनेक ठिकाणी आपल्या भाषणांमध्ये चीनच्या धोक्याबद्दल देशाला अवगत केले होते. परंतु प्रत्यक्ष ज्या दिवशी चीनने भारतावर आक्रमण केले त्या दिवशी मात्र गुरुजी झोपेतून रात्री खडबडून जागे झाले व ते म्हणाले की, मला असे वाटले की, माझ्या शरीरावरच कोणीतरी आक‘मण करीत आहे. इतके त्यांचे भारतमातेप्रती तादात्म्य होते.
हा देश पारतंत्र्यात असताना गुरुजींचा एकदा जालंधरला प्रवास झाला. त्यावेळेस जालंधरला खूप मुसळधार पाऊस सुरू होता. ज्या ठिकाणी स्वयंसेवकांचे एकत्रीकरण ठरलेले होते त्या ठिकाणी पण बरेच पाणी जमा झाले होते. तेथील स्थानिक अधिकार्यांनी गुरुजींना विचारले की, (Madhav Sadashivarao Golwalkar) गुरुजी आपण शारीरिक कार्यक्रमासह कार्यक्रम घ्यायचा की नाही? गुरुजी म्हणाले, पाऊस असेल किंवा काहीही असेल तरीही जे ठरले आहे त्या पद्धतीने कार्यक‘म घ्या. सर्व स्वयंसेवक भर पावसात प्रात्यक्षिक करीत होते. त्यानंतर गुरुजी भाषण करण्याकरिता उभे राहिले. त्यावेळेस एका स्वयंसेवकाने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली. त्यावेळेस ते त्याला म्हणाले की, स्वयंसेवक पावसात भिजत असताना माझ्या डोक्यावर छत्री कशाला? आणि त्यांनी ती छत्री नाकारली व भरपावसातच त्यांचे भाषण झाले. एका इंग्रज अधिकार्याने हे दृश्य पाहिले. त्यावेळेस तो म्हणाला की, हे लोक आज पावसाच्या धारा सहन करीत आहेत; हे उद्या बंदुकीच्या गोळ्याही सहन करतील. गुरुजींच्या नेतृत्वामध्ये अशा पद्धतीचे कार्यकर्ते तयार होत होते.
1947 साली देशाचे फाळणी होणार अशा पद्धतीचे वारे वाहू लागले होते. पंजाब प्रांतामध्ये (Madhav Sadashivarao Golwalkar) गुरुजींचा प्रवास होता. त्यावेळेस तेथे सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गामध्ये गुरुजींच्या भाषणाच्या पूर्वीच असा संदेश आला की, फाळणी नक्की होणार. जो भाग पाकिस्तानात जाणार होता तेथे मुसलमानांनी दंगे सुरू केले होते. त्यामुळे परिस्थिती अतिशय तणावग‘स्त झालेली होती. गुरुजी आपल्या भाषणात उपस्थित स्वयंसेवकांना म्हणाले की, जोपर्यंत तुमच्या गावातील प्रत्येक हिंदू सुरक्षितपणे भारतामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही कोणीही गाव सोडू नका. संघाचा स्वयंसेवक हा गाव सोडणारा शेवटचा माणूस असायला पाहिजे. त्याही परिस्थितीत गुरुजींनी पंजाब प्रांताचा आपला दौरा केला. ठिकठिकाणी स्वयंसेवकांचे बौद्धिक वर्ग झाले. गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे स्वयंसेवकांमध्ये बळ संचारले व त्यांनी मुस्लिम दंगेखोरांचा प्रतिकार करायला सर्वसामान्य हिंदू समाजाला सज्ज केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकेठिकाणी बोलताना श्रीगुरुजी म्हणाले की, महाभारताच्या युद्धामध्ये एकच अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाला, परंतु भारतमातेच्या संकटात संघाचे शेकडो अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाले. असे होते गुरुजींचे नेतृत्व. ज्यामुळे सर्वसामान्य स्वयंसेवकांनीसुद्धा असामान्य कार्य केले. प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदानसुद्धा करायला ते कचरले नाहीत.
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेच्या उडुपी येथील धर्म परिषदेमध्ये वेगवेगळ्या पीठाच्या शंकराचार्यांना एकत्रित आणण्याचे कार्य अतिशय दुष्कर होते. परंतु, (Madhav Sadashivarao Golwalkar) गुरुजींनी ते करून दाखविले व समस्त संतांच्या उपस्थितीमध्ये संत सभेने ठराव पारित केला की, कोणीही हिंदू पतीत नाही; सर्व एकमेकांचे भाऊ आहेत.
एके ठिकाणी प्रवासात असताना एका रिक्षा चालकाने त्यांना त्याच्या घरी चलण्याचा व चहा पिण्याचा आग‘ह केला. रिक्षा चालक खूप गरीब होता. त्याचे घरही फार छोटे होते. त्याने चहा केला व कुठल्याशा मळक्या कपड्याने तो गाळला. हे दृश्य पाहून उपस्थित स्वयंसेवक तो चहा पिऊ शकले नाहीत. परंतु, श्रीगुरुजी मात्र हसतमुखाने तो चहा प्यायले. उपस्थित स्वयंसेवकांना गुरुजी म्हणाले की, तुम्ही त्याला मळक्या कापडातून चहा गाळताना पाहिले. परंतु मी त्याचे प्रेम त्याला गाळताना पाहिले. त्यामुळे मी चहा प्यायलो नाही तर त्याचे प्रेम प्यायलो आहे. (Madhav Sadashivarao Golwalkar) गुरुजी एके ठिकाणी प्रवासात असताना त्यांना असे दिसले की, एका मैदानावर एक इंग्रज अधिकारी तरुण विद्यार्थ्यांकडून गोळीबाराचा अभ्यास करून घेत होते. त्यात अनेक तरुणांचे नेम चुकत होते. त्यांचा नेमबाजीचा तो सराव पाहिल्यावर श्रीगुरुजी तेथे गेले व त्याला म्हणाले की, मी एकदा निशाणा मारून पाहू का? गुरुजींच्या धोतर आणि बंगाली या पेहरावाकडे पाहून तो इंग्रज अधिकारी त्यांना म्हणाला की, हे फार कठीण कार्य आहे. तरीही गुरुजी म्हणाले, तुम्ही परवानगी देत असाल तर मी एकदा हे करून पाहू इच्छितो. त्याने गुरुजींकडे बंदूक दिली व गुरुजींनी त्या लक्ष्यावर नेम धरला आणि गोळी झाडली व लक्ष्यभेद केला. त्यावर श्रीगुरुजी म्हणाले, माझ्यासाठी बंदूक नवीन होती, परंतु मनाला एकाग‘ करण्याची सवय जुनीच होती.
वाराणसीमध्ये असताना संघाच्या एका कार्यकर्त्याने संघकार्यात झोकून दिले होते. परीक्षेचे दिवस जवळ आले होते. तो कार्यकर्ता नक्कीच नापास होईल, असे अन्य स्वयंसेवकांना वाटू लागले. ही बातमी (Madhav Sadashivarao Golwalkar) श्रीगुरुजींच्या कानावर पडली. त्यांना वाटले की, संघ कार्यामुळे कोणताही स्वयंसेवक नापास होता कामा नये. म्हणून गुरुजींनी त्याला बोलावले व म्हटले की, तुला पास झालेच पाहिजे. त्यासाठी तुला अभ्यास करावाच लागेल. परंतु तो कार्यकर्ता म्हणाला की, मला कोणते विषय आहेत हेसुद्धा माहिती नाही तर मग मी पास कसा काय होणार? परंतु, गुरुजींनी स्वत: त्याचे विषय जाणून घेतले व त्या विषयांची पुस्तके आणली. संध्याकाळी संघ कार्य झाल्यावर तो कार्यकर्ता गुरुजींकडे यायचा व गुरुजी त्याला शिकवायचे, असा क‘म चालला. गुरुजींनी इतर प्राध्यापकांनासुद्धा त्याला शिकवण्यासाठी विनंती केली व त्यांनीही ती मान्य केली. त्यामुळे तो कार्यकर्ता चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. एका सामान्य कार्यकर्त्याचीसुद्धा श्रीगुरुजी अशा पद्धतीने काळजी घ्यायचे, हे आपल्या लक्षात येते.
1948 साली संघावर महात्माजींच्या हत्येचा खोटा आरोप तत्कालीन काँग्रेस सरकारने केला. समाजामध्ये वातावरण कलुषित करण्यात आले होता. (Madhav Sadashivarao Golwalkar) श्रीगुरुजी ज्या घरी राहत होते त्या घरावर अनेक लोक लाठ्या-काठ्या घेऊन पोहोचले व आता गुरुजींच्या घराचा दरवाजा तोडून ते आज प्रवेश करतील की काय, असे वाटू लागले. घराच्या आतमध्ये स्वयंसेवक होते. त्यांच्याजवळ दंड होते. ते गुरुजींना म्हणाले की, आम्ही आत्ताच दरवाजा उघडून या सर्वांना पिटाळून लावतो. परंतु, श्रीगुरुजी त्यांना म्हणाले, जे लोक आज मला मारायला आलेले आहेत उद्या तेच लोक माझ्या गळ्यात हार टाकायलासुद्धा येतील. त्यामुळे स्वयंसेवक आणि हिंदू समाज यांच्यामध्ये कुठलाही संघर्ष उत्पन्न होता कामा नये. अशा पद्धतीचे लोकोत्तर व्यक्तिमत्त्व श्रीगुरुजींचे होते. एके दिवशी पांडुरंगशास्त्री आठवले त्यांना म्हणाले की, गुरुजी तुम्ही संघाकरिता खूप मोठे योगदान दिलेले आहे. हे वाक्य ऐकल्यावर श्रीगुरुजी त्यांना म्हणाले की, डॉक्टर हेडगेवार यांनी जो संघ माझ्या हातात सोपविला तो संघ जसाच्या तसा पुढील पिढीच्या हातात सोपविणे एवढे जरी कार्य मी करू शकलो तरीही खूप मोठे कार्य झाले, असे मला वाटेल. असे होते श्रीगुरुजी यांचे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून देशभक्तीचा संदेश ग‘हण करणे हेच (Madhav Sadashivarao Golwalkar) श्रीगुरुजींचे वास्तविक स्मरण आहे, असे वाटते.
- 9552535813